Solapur City

जोडभावी पेठेतील गोलचावडी भागात स्मार्ट सिटीच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

बोगस नळांची चौकशीला ब्रेक; मिटर बसवल्यास पाण्याचा अपव्यय टाळेल
सोलापूर- प्रभाग क्रमांक तीन मधील गोल चावडी भागांमध्ये शुक्रवारी सायंकाळी पाणी आले असता नागरिक रस्त्यावर ती पाण्याने घर, गाडी, रस्ता स्वच्छता करून पाण्याची नासाडी करीत असल्याचे दिसून आले. माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थान भागातील पाणीपुरवठा दोन वेळेत होत असल्याने पाण्याचा वापर जास्त होत आहे. सद्या हद्दवाढ भागात 6 दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना गोल चावडी भागात दोन वेळा वेगवेगळ्या लाईन द्वारे पाणी पुरवठा केला जातोय. तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असलेल्या भागात स्मार्टसिटीचे कोणतेही अधिकारी न फिरकल्याने नागरिकांच्या समस्या निर्माण झाली आहे.
                        ड्रेनेज लाईन वारंवार तुंबून रस्त्यावर पाणी जाताना नागरिकांना घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे. सदर पाणी वाया जाताना एक नागरिक रस्यावरून जाताना गाडी स्लिप होऊन अपघात घडला. परंतु वेळीच नागरिक घटनास्थळी धाव घेतल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. सदर घटनेनंतर त्या नागरिकाचे कपडे घाण झाले. रस्त्यावरील पाण्याची घटनास्थळी शूटिंग करताच सर्व नागरिक पाणी बंद करून निघून जाण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटी भागांमध्ये झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लाखो लिटरचे पाण्याचे वाया जात आहे याला जबाबदार कोण ? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकीकडे सोलापूर शहराला चार दिवस पाणीपुरवठा होत आहे आणि दुसरीकडे स्मार्ट सिटी या भागांमध्ये दिलेल्या अनधिकृत नळ आणि अधिकृत नळा मार्फत लाखो लिटर पाणी रस्त्यावर नागरिक सांडत आहेत. लाकडी फर्निचर दुकान, चिराग भवन, सिद्धाराम म्हेत्रे घराजवळील परिसर, गोल चावडी दवाखाना, मंगळवार बाजार परिसर या ठिकाणी रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसून आले. स्मार्ट सिटी मार्फत देण्यात आलेल्या बोगस नळांचे पाणी तोट्या अभावी पाणी रस्त्यावर सांडत आहे. काहीवेळा पाण्याचे नियोजन कोलमडल्याने 5 ऐवजी 7 वाजता पाणी सोडण्यात येते अशी नागरिकांची तक्रार आहे. याबाबत सदर घटनेची माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांना दिले असता याबाबत पूर्ण चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

चौकोट ओळ

स्मार्टसिटीच्या निकृष्ठ दर्जेच्या कामाची तक्रार गेल्या दिड महिन्यांपासून नागरिक करत आहेत. त्याचा आम्ही पाठपुरावा केला आहे. माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासाजवळ पाण्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना कळवले आहे. अद्याप अधिकाऱ्यांनी मला कोणतेही उत्तर दिले नाही. पुढील पाणीपुरावठ्या दिवशी महापालिकेत रस्त्यावरील पाणी आणून समस्त नागरिकांसह आंदोलन करणार- सुरेश पाटील, नगरसेवक प्रभाग क्रमांक 3

पाणी आल्यादिवशी या भागात रस्त्यावर पाणी वाहत असते. अनेकदा अपघात घडले आहे. संबंधित अधिकारी वेळेवर काम न केल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे- नागरिक

गद्यम ऑफिस ते कन्ना चौक मार्गे तीन नंबर बोळात बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी तोटी नसल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे. चिराग भवन समोरील बोळात रास्ता धुवाताना

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com