Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर SMC- सोलापूर महापालिकेने मिळकत करात वाढ झाल्याने नागरिकांसमोर मोठे आवाहन उभे आहे. त्यातच मिळकतदारांची तक्रारी दूर करण्यासाठी पालिका आयुक्तांनी जुनी कोव्हिड कंट्रोल रूम तक्रार घेण्यासाठी सुरू केले आहे. परंतु त्या विभागात मनुष्यबळ कमी असल्याने हजारो नागरिक रांगेने उन्हात उभे असल्याचे दिसून आले. आधिच अनेक भागात नागरिकांचे कर वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच पुन्हा कामावर सुट्टी टाकून 3 ते 4 तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे.
(SMC) शहरातील मिळकतींचे दर सन 2005 पासून वाटप झालेले नाही त्यानंतर एक कंपनीने सर्वे केला होता. आता करवाढीचा नोटीस महापालिकेने दिले. त्यामुळे अनेकांची मिळकत कर दुप्पट तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना तक्रारी येत आहेत. 21 दिवसांची मुदत असताना रोज गर्दी वाढतच चालली आहे. गर्दी आणि नागरिकांचे त्रास कमी करायचे असेल तर पालिका आयुक्तांनी सर्व तक्रारी झोन कार्यालयात घेण्यासाठी आदेश काढावे अशी मागणी होत आहे.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews