SMC Election
Election Solapur City

SMC Election : निष्ठावंत सैनिकांनाच पालिकेची उमेदवारी : पुरुषोत्तम बरडे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

संपर्कप्रमुख आगवणेंनी घेतली शहर मध्य पदाधिकाऱ्यांची बैठक

सोलापूर SMC Election- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आयात उमेदवारांपेक्षा ज्यांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली अन् तग धरुन आहे अशा निष्ठावंत शिवसैनिकांनाच उमेदवारी दिली जाईल असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी SMC Election नवनियुक्त संपर्कप्रमुख शशिकांत आगवणे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्याप्रसंगी बरडे बोलत होते. यावेळी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, शहर मध्यचे नुतन उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, नगरसेवक भारतसिंग बडुरवाले, प्रसिध्दीप्रमुख निरंजन बोध्दुल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आगामी पोटनिवडणुकीत जाधव यांच्या जागेवर त्यांच्या पत्नीची बिनविरोध निवड करण्याची मागणी

                   येथील प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या आजवरच्या कार्याचा SMC Election आढावा घेऊन सविस्तर अहवाल पक्षातील वरिष्ठांना सादर करणार असल्याचे संपर्कप्रमुख शशिकांत आगवणे यांनी सांगितलं. पक्षाने पदाच्या रुपात जबाबदारी दिली असून मजबूत पक्षबांधणी करुन या मतदारसंघातून SMC Election शिवसेनेचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणणे हेच ध्येय असल्याचे मत नुतन उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर यांनी मांडले. या बैठकीस उपशहरप्रमुख धनराज जाधव, रविकांत कांबळे, रेवण बुक्कानुरे, चंद्रकांत मानवी, धनराज जानकर, अनिल दंडगुले, प्रशांत कदम, अंबादास चव्हाण, बालाजी विठ्ठलकर, दशरथ पाथरुट, रविकांत गायकवाड, सुशील कन्नुरे, राज पांढरे आदींसह शिवसेनेचे शहर मध्य मधील पदाधिकारी उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews