Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
संबंधित अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासून चुकीच्या पद्धतीने ही निविदा प्रक्रिया
आयुक्तांच्या अधिकृत अभिप्राय दिलेले नसताना ही निविदा प्रक्रिया महानगरपालिका सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी कसे?
सोलापूर SMC- घंटागाडी व मजूर पुरवठा पटेल कॉन्ट्रॅक्टर मक्तेदार यांना देण्यात येत असलेल्या अक्षरी रुपये कोणत्या दराने आणि कुठल्या कायद्याच्या आधारे विषय सर्वसाधारण सभेकडे येत आहे याच्या प्रथमता मा. आयुक्त पी. शिवशंकर यांनी खुलासा करावा. मक्तेदार एन.एच.पटेल कन्स्ट्रक्शन या मतदाराने कुठल्या आधारे हे दर निश्चित केले आहेत ? शहरातील घंटागाडी, ड्रायव्हर व बिगारी असे एकूण 587 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव आहे.
पाला वरील वंचितांना दिले भोगीचे जेवण; शिव बसव सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
SMC यात प्रत्येक कर्मचार्यांना किमान दर शिवाय 0.001 हे दर कुठल्या अक्षरी पैशांमध्ये मोडतात याचाही खुलासा होणे गरजेचे आहे. तसेच आयुक्तांनी मुख्य लेखापरीक्षक यांचा अभिप्राय देण्यास आदेश दिले होते. परंतु मुख्य लेखापरीक्षक एक, दोन आणि तीन व विधान सल्लागार स्वयंस्पष्ट निविदा संदर्भात आदेश कुठल्याही प्रकारचे अभिप्राय दिला नाहीत. परंतु खातेप्रमुख व त्यांचे अधिकारी यांनी आर्थिक हितसंबंध जोपासून ही निविदा प्रक्रिया एकाच मक्तेदारास देण्याचा षडयंत्र रचला आहे. मा.आयुक्त साहेबाचे दिशाभूल झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. दरम्यान मुख्य लेखापरीक्षक व विधान सल्लागार यांनी एन. एच. पटेल या मक्तेदार संबंधी कुठलीही अधिकृत अभिप्राय दिलेले नसताना ही निविदा प्रक्रिया महानगरपालिका SMC सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदर मक्तेदाराचे निविदा संगणक प्रणालीमध्ये सर्वात कमी दराचे निविदाधारक म्हणून दर्शविले आहे. परंतु संगणक प्रणालीमध्ये अक्षरी दर आलेले नाहीत. संबंधित खातेप्रमुख आणि अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंध जोपासून चुकीच्या पद्धतीने ही निविदा प्रक्रिया करीत आहेत असा आरोप भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले आहे. तरी आयुक्त साहेबांनी यासंदर्भात निविदा प्रक्रिया रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबवावी अन्यथा शासन स्तरावर तसेच यासंदर्भात वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी म्हणाले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews