Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- अमर बिराजदार मित्र परिवार व श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ बिराजदार यांचा नुकताच वाढदिवस झाला होता,त्या निमित्त त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला व माजी नगरसेवक जगदीश अण्णा पाटील यांचा राजभवनात राज्यपाल महोदयांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला होता,त्याप्रीत्यर्थ त्यांचा श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी अमर बिराजदार व जगदीश पाटील यांच्या कार्याचा कौतूक केलं,कोरोना काळात दोघांनी केलेलं कार्य हे सर्वांकरिता प्रेरणादायी असल्याचे सांगितले. माजी महापौर महेश अण्णा कोठे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अमर बिराजदार यांना यंदा महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळू दे आम्ही त्यांच्या सोबत आहोत, व अमर बिराजदार यांचा पुढचा वाढदिवस आम्ही महापालिकेत साजरा करू असे शुभेच्छा देताना सांगितले
हे वाचा- ‘लोकमंगल’ला राज्यात दुसरे स्थान प्राप्त करून देवू : आ.देशमुख
सोलापुरातील नामवंत वकील मिलिंद थोबडे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अमर बिराजदार हे एक सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून काम करणारे नेते आहेत व अशा लोकांची सभागृहात गरज असून येणाऱ्या महापालिकेत ते आपल्याला नगरसेवक म्हणून पाहायला मिळतील असे शुभेच्छा दिले. माजी नगरसेवक केदारनाथ उंबरजे यांनी मनोगत व्यक्त करताना अमर बिराजदार हे नगरसेवक झाले पाहिजे हे शेळगीच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे,ते कोणत्याही पक्षाने उभे राहू दे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. सत्काराला उत्तर देताना माजी नगरसेवक जगदीश पाटील साहेबांनी श्रीराम जन्मोत्सव समिती व अमर बिराजदार मित्र परिवाराचे आभार मानले
सत्कारास उत्तर देताना अमर बिराजदार यांनी सर्व मित्र परिवाराचे आभार मानले व मला माझ्या मित्र परिवारामुळे माझ्यावर 2017 साली अन्याय होऊन देखील काम करण्याची ऊर्जा प्राप्त झाली असे सांगितले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, माजी महापौर महेश अण्णा कोठे, मिलिंद थोबडे, जगदिश पाटील,केदारनाथ उंबरजे, चन्नवीर चिट्टे, प्रभुराज मैंद्रगीकर, राजशेखर विजापूरे, हेमंत पिंगळे, नगरसेवक अमित पाटील, बाबुराव जमादार, अण्णाराव बाराचारे, संजय होमकर, संजय साळुंखे, सिध्दाराम बावकर आदींची उपस्थिती होती
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर बिराजदार,सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने,भिमाशंकर झुरळे.मल्लिकार्जून सावळगी.पिनू करपे,यतीराज होनमाने. विनोद गडगे,राहुल धुत्तरगी,धानप्पा दहिटने,छोटू झुरळे,सतीश परेली,गुरुनाथ पदमगोंडा,आशिष दुलंगे,सुनील निंबर्गी,सिद्धू धुत्तरगी,डोंगरेश चाबुकस्वार,सुंर्यकात निंबर्गी.श्रीकांत भरडे,अक्षय हनगुंद,रोहित कोळकुर,सागर अप्पू बिराजदार,ओम होमकर,आदिनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय अंजिखाने यांनी केले व सूत्र संचालन गंगाधर झुरळे,आभार सागर अतनुरे यांनी मानले.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143