Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
101 गरजू महिलांना साड्याचे वाटप व सिव्हिल हॉस्पिटल येथे पाण्याचे बाटली व बिस्कीटचे वाटप
सोलापूर- जय हिंद फूड बँकेच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक भावनेतून 101 गरजू महिलांना नवीन साड्यांचे वाटप करण्यात आले .गेल्या वर्षी पासून कोरोना च्या सावटाखाली असताना सगळीकडेच परिस्थिती हालाखीची आहे. अश्यातच गरजू महिलांच्या साठी साडी चे वाटप जय हिंद फूड बँकेच्या ऑफिस मध्ये करण्यात आले.तर सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हाभर मधून आलेल्या पेशंट व त्यांच्या नातेवाईक याना पाण्याचे बॉटल व बिस्किट चे वाटप करण्यात आले. प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम करत असल्याचे सुरेश तमशेट्टी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले .तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंट व त्यांचे नातेवाईक यांच्या साठी प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही 100 पेक्षा जास्त पाणी बॉटल व बिस्किट चे पॅकेट्सचे वाटप केल्याचे प्रा विक्रमसिंह बायस यानी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले.भूकमुक्त भारत अभियान राबवित असताना पूरस्थिती असेल किंवा अन्नदान सेवा चे कार्य चालू असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी यांनी व्यक्त केले.
हे वाचा- महावितरण बारामती परिमंडल यांच्या वतीने गुणवंत तांत्रिक कामगार यांना पुरस्कार प्रदान
या उपक्रमासाठी करीना साडी सेंटर यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी जय हिंद फूड बँकेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी, उपाध्यक्ष प्रा विक्रमसिंह बायस, सुरेश तमशेट्टी, शुभम बल्ला, प्रथमेश काका रापोल, श्रीकांत भिमनपल्ली, नवीन गरदास, समर्थ बल्ला, सुधीर तमशेट्टी, अनिकेत सरवदे, विनय गांगजी हे उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
सोलापुरात अगदी कमी वेळात घरा घरात पोहचलेले घरगुती जेवण
अनुभव आणि चव यांची जोड घेऊन, आमच्याकडे रोज आठवड्याचे किंवा महिन्यभरचे डबे पुरविले जातात.
आजच संपर्क साधा- 9307434314
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143