Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
बेडर समाजातील जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नावनोंदणी सुरू- बाबुराव जमादार
सोलापूर Social- शिवभक्त बेडर कण्णप्पा सामाजिक संस्था व बेडर वाल्मिकी नायक संघ यांच्यावतीने “दिनदर्शिका 2022” चे प्रकाशन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडला. सदर प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बेडर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुराव जमादार, शामराव धुरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे बसण्णा गुजले यांनी गेल्या तीन वर्षापासून संस्थेने करीत असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक गरजू सहा जोडप्यांचे लग्न सोहळा पार पाडण्यास केलेल्या संस्थेच्या योगदानाची माहिती दिली.
हे वाचा- सार्वजनिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत आणण्यासाठी ई- श्रम पोर्टलद्वारे माहिती संकलनाला सुरूवात
(Social) आगामी काळात 2022-23 मध्ये बेडर समाजातील गरजू जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचे योजिले आहेत. या विवाह सोहळ्यास संबंधित वधू-वरांनी कडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी बेडर समाजातील गरजू व इच्छुक जोडप्यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यात (social) सहभागी व्हावे असे संस्थेतर्फे आव्हान करण्यात आले आहे. सदर प्रसंगी संस्थेचे दशरथ भोसले, अनिल वाल्मीकी, नगरसेवक सुनील कामाठी, शिवकुमार कामठी, आकाश कामठी, एडवोकेट बसवराज बेरड, संजय गुजले आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews