social-media-strict-action
Maharashtra

Social Media : मुस्लिम समाजाबद्दल चुकीची पोस्ट टाकणाऱ्यावर कड़क कारवाई करा; प्रहारची पोलिस आयुक्तांकडे मागणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Social Media – सोलापूर शहरात दिनांक 4-1-2022 रोजी जातीयवादी पोस्ट केल्याने सोलापूर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. याची सविस्तर माहिती अशी मोहन भिमराव वैद्य या इसमाने सोशल मीडियावर तसेच व्हाट्सअप ग्रुप वर दिनांक 04-1- 2022 रोजी धार्मिक तेढ निर्माण करणे,धार्मिक भावना दुखावने शत्रूत्व व देश भावना निर्माण करून शांतता भंग करण्याच्या हेतूने ही पोस्ट टाकण्यात आली होती.. ही पोस्ट लेखी स्वरूपात असून मुस्लिम धर्माबाबत बदनामीकारक अश्लील वक्तव्य या पोस्टमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे मुस्लीम समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

भाजपमध्ये निष्ठावंतांना संधी मिळतेचः आ. देशमुख; दक्षिण तालुका भाजयुमोची बैठक

             त्यामुळे आता सोलापूर शहरात कालपासून शहरात Social Media तणावपूर्ण स्थितीही निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणावर प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाले असून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या वतीने सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये Social Media आरोपी मोहन भिमराव वैद्य यावर वाढीव कलमे लावून कठोर ती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आणि योग्य ती कारवाई न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही कठोर शिक्षा करण्यासंदर्भात निवेदन देणार असल्याची माहिती दत्ता भाऊ मस्के पाटील यांनी सांगितल. याची अधिक माहिती प्रहारचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील, शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी, सोलापूर शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com