Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- कोरोना काळातच नव्हे तर पुरातन काळापासून डॉक्टरांचे स्थान समाजात महत्त्वाचे राहिले आहे. डॉक्टरांमध्ये आपण देवाचे रूप पाहत असतो. वीरशैव समाजातील महिला डॉक्टर एकत्र येऊन रुग्णसेवेबरोबरच समाजसेवा करीत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी यांनी केले. वीरशैव लेडी डॉक्टर्स फोरमतर्फे गरीब, गरजू, निराधार आणि विधवा अशा 100 कुटुंबियांना धान्य वाटप शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर मैंदर्गी मठाचे मठाधिपती नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी, डॉ. कमल अवसेकर, वीरशैव लेडी डॉक्टर्स फोरमचे डॉ. राजश्री मठ, डॉ. ज्योती मोकाशी, डॉ. अश्विनी देगावकर उपस्थित होते.
एक महिना पुरेल इतके 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 2 किलो साखर, 1 किलो तूरडाळ, 1 लिटर तेल, अर्धा किलो मटकी, अर्धा किलो मूग, 3 कपड्याचे साबण, 3 अंघोळीचे साबण, पाव किलो मिरची पावडर अशा स्वरूपाचे धान्याचे किट बनविण्यात आले आहे. 100 कुटूंबांना प्रत्येकी 1 हजार याप्रमाणे 1 लाख रुपयांचे धान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. माधुरी अवसेकर, डॉ. स्मिता खोबरे सुजाता बिरादार, डॉ. रेणुका शिरीगोंडा, डॉ. सोनाली घोंगडे डॉ. महानंदा हिटनळी, डॉ. आशाराणी मेडीदार, माधुरी बिराजदार, सुचित्रा बिराजदार, ज्योती शेटे, रेशमा निडगुंदी, दीपा तोटद, विजया जेऊरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजश्री मठ यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. अश्विनी देगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ज्योती मोकाशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, सोमेश्वर याबाजी, विजयकुमार बिराजदार, सिद्धेश्वर कोरे, अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, बद्रीनाथ कोडगी-स्वामी यांनी परिश्रम घेतले.
फोटो वीरशैव लेडी डॉक्टर्स फोरमतर्फे धान्य वाटप करताना श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी, डॉ. कमल अवसेकर, डॉ. राजश्री मठ, डॉ. ज्योती मोकाशी, डॉ. अश्विनी देगावकर, डॉ. स्मिता खोबरे
#solapurcitynews