fbpx
social-sheets-distribution-of-hats

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Social- सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण आहे, थंडीच्या बचाव करण्यासाठी पांघरून तसेच व गरम कपड्यांचे गरज भासत असते ही गरज ओळखून साईराम मानव सेवा संस्थेच्या वतीने शहरातील भिक्षेकरी, बेघर, तसेच शहरातील फुटपाथवर वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शारीरिक दृष्ट्या अत्यंत गरज असणाऱ्या गरम चादर व डोक्यास गरम टोपी वाटप कार्यक्रम करण्यात आले.

           दरम्यान राजस्थान जयपूर येथील चंद्रभान बलाई यांच्या परिवाराकडून या Social गोरगरीब भिक्षेकरी व्यक्तींना 100 हून अधिक गरम चादर व टोपी यांनी उपलब्ध करून दिली यावेळी शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड युवा समाजसेवक श्रीकांत वाडेकर साईराम मानव सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईराम भैरी, उपाध्यक्ष नागेश उरगोंडा, कार्याध्यक्ष किशोर बंडी, खजिनदार प्रवीण गंडी, चंद्रशेखर बलाई, चंद्रशेखर भोसले चेतन चन्ना पठाण, सिद्धय्या पारे, अमित चव्हाण बालाजी पांढरे दीपक चव्हाण शंकर मेलगू आदींची उपस्थिती होती. साईराम मानव सेवा संस्था ही अनाथ गरीब व भिक्षेकरी व्यक्तींसाठी Social तसेच गोमाता बचाव सेवेसाठी अविरत कार्य करीत आहेत संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात साईराम संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मनोगत यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. साईराम मानव सेवा संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरिबांसाठी विशेषतः अनाथ गरीब, भिक्षेकरी यांच्या साठी कार्य करणारी ही संस्था आहे समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हे कार्य अविरत सुरू असल्याचे संस्थेचे संस्थापक साईराम भैरी यांनी यावेळी सांगितले.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update