fbpx
social-work-regarding-garden-problems

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मनपा उपाआयुक्त धनराज पांडे यांनी केली विणकर बागेची तातडीने पाहणी

सोलापूर social work – सोलापूर शहरातील पूर्व भागात ऑक्सीजन पार्क म्हणून कालपर्यंत गणली जाणारी विणकर बाग, नव्याने कारण ‘वेगळी’ च ओळख धारण करीत आहे. ही बाब लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेने विणकर बागेला संरक्षक भिंत आणि मजबूत प्रवेशद्वार बांधावे या मागणीसाठी जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांनी महानगरपालिकेत निवेदन दिले. त्या निवेदनाची दखल मनपा उप-आयुक्त धनराज पांडे यांनी विणकर बागेला तात्काळ भेट देऊन नागरी अडचणींसंदर्भात पाहणी करून त्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले.

20 तारखेनंतर मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी कामावर येणार; वेळ पडल्यास मेस्मा लावावा लागेल – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

social work पूर्व भागातील विणकर बागेत सकाळी-सायंकाळी नागरिक आणि बालगोपाळाचा वावर असतो. अनेक नागरिक मार्निंग वाॅकच्या निमित्ताने नियमितपणे विणकर बागेत येत असतात. त्या बागेत विणकर यांचा पुतळा असून त्याचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे, मात्र त्या पुतळ्यास संरक्षक कठडा नसल्यामुळे पुतळा परिसरात लहान मुलांचा मुक्त संचार असतो. त्याचवेळी रात्री मद्यपींची गर्दी वाढत असल्याची चिंताजनक बाबही निदर्शनास आल्याने समाजसेवक social work आनंद गोसकी यांनी या बागेचे पावित्र्य कायम राखले जावे, या भावनेतून विणकर बागेत असलेल्या समस्या, एका निवेदनाच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या.

           जनआधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांनी, विणकर बागेस मजबूत संरक्षक भिंत, भव्य प्रवेशद्वार आणि विणकर पुतळ्या भोवती लोखंडी ग्रीलची संरक्षक जाळी बसविण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली. त्या निवेदनाच तात्काळ दखल घेऊन मनपा उपआयुक्त धनराज पांडे यांनी विणकर बागेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीत, वस्तुस्थिती लक्षात घेऊन उपयुक्त पांडे यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करून विणकर बागेचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आनंद गोसकी यांना आश्वासन दिले.

             हल्ली विणकर पुतळ्याला जाळी नसल्याने लहान मुले थेट पुतळ्यावर जाऊन बसतात. त्या पुतळ्याभोवती असलेल्या हिरवळीवर काही जण झोपा काढतात. बागेच्या मागच्या गेटच्या बाजूला भिंत तुटली असल्याचा गैरफायदा घेऊन मद्यपी मंडळी, त्या आडमार्गाने बागेत येऊन मद्यपान करतात, गोंधळ घालतात आणि शिवीगाळी करतात, त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ही वस्तुस्थिती आहे. याप्रसंगी वसंत कामुर्ती, पुरूषोत्तम वग्गा, श्रीशैल काटकर, शाम गुंडु अन्य नागरिकांनी सांगण्यात बागेतील सोमपा कर्मचारी रात्रीच्या वेळी गेट उघडत नसल्याचे व कर्मचारी व्यस्थित देखभाल करीत नसल्याच्या तक्रारी उपाआयुक्त पांडे यांच्याकडे केल्या. त्याचीही तात्काळ दखल घेत,पांडे यांनी तात्काळ सोमपाचे जमादार व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना फैलावर घेत, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या. उप-आयुक्त पांडे यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेउन स्वत: पाहणी करण्यास आल्याबद्दल व तात्काळ कामे मार्गी लागल्याबद्दल जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक social work आनंद गोसकी यांनी पांडे यांचे आभार व्यक्त केले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update