fbpx
Solapur City News 13

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे- कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोईडची मोठ्या प्रमाणात फवारणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा आणि सर्व पदाधिकारी यांच्याकडून फवारणी अधिक तीव्र करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने ५ पथकाच्या साहाय्याने ही फवारणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सर्व प्रभाग समितीमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरू असून ही मोहिम अधिक तीव्र आणि व्यापक करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा दिल्या आहेत.
                   या मोहिमेतंर्गत आज कळवा, उथळसर,नौपाडा- कोपरी, वागळे, लोकमान्य – सावरकरनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात कोव्हीड -१ ९ विषाणू नियंत्रणासाठी ५ टिम नव्याने स्थापन करुन सकाळी ७.०० वाजेपासून जंतुनाशक औषधाची युध्द पातळीवर फवारणी करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी ९ बोलेरो जीप ८ ट्रॅक्टर व ६ ई – रिक्षा वाहनातून स्प्रेईग मशिन मधून 60 कर्मचाऱ्यां मार्फत विशेष फवारणी मोहिम हाती घेऊन जंतूनाशक फवारणी करण्यात आली. यामध्ये प्रमुख रस्ते, प्रतिबंधित क्षेत्रे, हाॅटस्पाॅटस् याबरोबरच संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली आहे. तसेच ९५ हॅण्ड पंपाने शहरात वेगवेगळ्या ईमारती व सार्वजनिक ठिकाणी फवारणी करणे देखील नियमित चालू आहे.यापुढेही शहरात औषध फवारणी सुरूच राहणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update