Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर BJP- भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी एका निर्मला यादव नामक नात्यातील महिलेने आपणास हनिट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दिली होती. त्याच महिलेने एका रूममधील दोघांचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच वायरल झाला असून या व्हिडीओ मुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओ मध्ये संबंधित महिला तक्रारदार निर्मला यादव यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना असे म्हंटले आहे कि स्वतःचे लग्न होऊन सुद्धा मला का फसवलं ? या संबंधित महिलेने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. त्याच बरोबर सत्ता स्थापनेनंतर फडणवीसांच्या भेटीदरम्यान गुन्हा नोंद झाल्याच्या चर्चेला उधाण आल्याने श्रीकांत देशमुखांच्या व्हायरल व्हिडीओ बाबत फडणवीसांना भेटीगाठी झाल्या का असे उलटसुलट चर्चा आता समोर आली आहे. संबंधित प्रकारांनावर पडदा टाकण्यासाठी भेटी झाल्याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहे.
हे वाचा- प्रहारच्या आंदोलनास यश ,70 हजार विद्यार्थ्यांना मिळाला न्याय ; विद्यापीठ प्रशासनाने घेतली माघार
आता BJP भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून श्रीकांत देशमुखांवर कारवाई होते का? या कडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. रणरागिणी आणि महिलांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या भाजपच्याच चित्रा वाघ या प्रकरणाकडे संबंधित महिला निर्मला यादव या तक्रार केल्यानंतर वैयक्तिक लक्ष घालून या महिलेला न्याय मिळवून देणार का? श्रीकांत देशमुख हे भाजपचे असल्याने आणि भाजपाची सध्या राज्यात सत्ता असल्याने या प्रकरणावर पडदा टाकला जाईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय? या प्रकरणामुळे श्रीकांत देशमुखांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते का? हे पाहणे आता गरजेचे आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143