fbpx
IMG 20210511 WA0024
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूरचे चांगले मार्केटिंग होऊन या शहरांमध्ये उद्योगधंद्याची वाढ व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी, सोलापूर जिल्हा समृद्ध जिल्हा व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 2018 मध्ये करण्यात आली, सोलापूर फेस्टिवल सारखे विविध उपक्रम आयोजित करणाऱ्या सोलापूर सोशल फाउंडेशन या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून या ऑनलाईन व्याख्यानमालेत नामवंत व्यक्तींची व्याख्याने होणार आहेत. या वर्धापन दिनानिमित्त निबंध स्पर्धा आणि फोटोग्राफीची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला सर्वांनी अवश्य पहावी असे आवाहन सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.सुभाष देशमुख यांनी केले आहे.

हे वाचा- दिलासादायक! खाजगी झोपडपट्टीवर रमाई आवास योजना राबविणार

दिलासादायक! खाजगी झोपडपट्टीवर रमाई आवास योजना राबविणार


                वर्धापन दिनाची फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला गुरूवार दिनांक १३ मे पासून सुरु होणार असून तिच्यात सोलापूरच्या मार्केटिंग विषयी आणि ब्रँडिंग विषयी विषय मांडले जाणार आहेत. व्याख्यानमालेचे पहिले व्याख्यान नामवंत वक्ते आणि लेखक प्राध्यापक विशाल गरड हे देणार असून सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या व्याख्यानात प्राध्यापक गरड हे ‘कलाविश्वात सोलापूरचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. प्राध्यापक विशाल गरड हे बार्शीचे राहणारे असून त्यांच्या लघुपटाला नुकताच राष्ट्रीय स्तरावरचा पहिला पुरस्कार मिळालेला आहे.
             शुक्रवार दिनांक 14 मे रोजी सोलापूरचे मोटिवेशनल स्पीकर अनिश सहस्त्रबुद्धे यांचे व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान सायंकाळी पाच वाजता होईल. सोलापूरच्या विकासामध्ये अनेक अडचणी आहेत परंतु सोलापूरचे लोक नकारार्थी फार बोलतात तेव्हा अशा लोकांना नजरेसमोर ठेवून अनिश सहस्त्रबुद्धे हे ‘सोलापूर साठी मी आणि माझ्यासाठी सोलापूर’ या विषयावर बोलणार आहेत. शनिवार दिनांक 15 मे रोजी ज्येष्ठ पत्रकार आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांचे व्याख्यान ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘सोलापूर ब्रँडिंग बँड’ असा आहे. राजा माने यांचे व्याख्यान शनिवारी सायंकाळी सात वाजता होईल.
                   रविवार दिनांक 16 मे च्या व्याख्यानात संदीप भाजीभाकरे पोलीस उपायुक्त मुंबई शहर यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत. संदीप भाजीभाकरे हे माढा तालुक्यातले असून त्यांनी स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून पोलीस खात्यामध्ये मोठे पद मिळवलेले आहे. त्यांचे व्याख्यान रविवारी सायंकाळी सात वाजता होईल. विषय कोरोनाशी संबंधित आहे. ‘कोरोना काॅशीयस यस, पॅनिक नो,’ असा असेल. सोमवार दिनांक 17 मे च्या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प सोलापूर सोशल फाउंडेशन चे मार्गदर्शक तसेच ब्रँड अँबेसिडर आणि नामवंत अभिनेते राहुल सोलापूरकर हे गुंफणार आहेत. त्यांचे व्याख्यानाचा विषय हा माझ्या स्वप्नातील सोलापूर असून हे सोमवारी सायं 7 वाजता होईल. वरील सर्व व्याख्यान आपल्याला सोलापुर सोशल फाउंडेशन च्या फेसबुक पेज ( Solapur Social Foundation ) वर होणार असून सोलापुरकरांनी अवश्य पहावे असे आवाहन सोलापुर सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update