Solapur City

सोलापूर महानगरपालिका सेवानिवृत्त सेवकांचा वेतनाचाप्रश्न प्रश्न लवकरच मार्गी लावणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई – सोलापूर महानगर पालिका सेवानिवृत्त सेवकांचा पाचवे, सहावे , सातवे वेतनाचा थकित फरक मिळण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पेन्शनर संघटना सोलापूर महानगरपालिका कार्याध्यक्ष तथा माजी नगर सचिव अँड फतेसिंह चव्हाण यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनाची गंभीर दखल घेत मंत्री शिंदे यांनी संबंधित सोलापूर महानगरपालिकाचे जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आजतागायत 648 सेवानिवृत्त सेवकांचा 5 वे वेतन आयोगाचा फरक गेल्या 25 वर्षापासून वंचित आहेत व 6वे वेतन आयोगाचा फरक सेवानिवृत्त 960 लोकांचा सध्या फरक प्रलंबित आहे. सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव अध्याप महाराष्ट्र शासनाकडे महापालिका प्रशासनाने पाठविला नाही. आजमितीला पाचव्या वेतन २५ वर्ष, सातवे वेतन 15 वर्ष यांचा फरक अजूनही मिळाला नाही. लवकरच याची पूर्तता व्हावे असे निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे, युवा उद्योजक संतोष फताटे आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143