fbpx
images 1 2 सोलापूरात रेशनदुकानदारांची मुजोरी वाढली; ग्राहकांना देतात धमक्या
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर(सुनिल कोडगी)- सोलापूर शहरात असलेल्या 90 टक्के रेशन दुकानदार ग्राहकांना फसवणूक करून धान्य लाटताना दिसत आहे. मोदी सरकार येताच रास्त भाव धान्य दुकान थेट ऑनलाइन जोडून दिल्याने ग्राहकाला घरी बसल्या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेल्या मालाची यादी पाहू शकतो. देशात वन नेशन वन रेशन काही दिवसात सुरू होणार त्यात दुकानदार दिवसेंदिवस सामान्य जनतेची फसवणूक करताना दिसत आहे. ब झोन अंतर्गत असलेल्या भवानी पेठेत थेट नागरिकांना धान्याची फसवणूक करून धान्य कमी देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नियमानुसार पावती मागितल्यास पावती देत नाही, नियमित दुकान न उघडणे, धान्य फलकावर उर्वरित साठा व चालू महिन्यातील साठा याची माहिती न दर्शविणे, परस्पर अंगठा मारणे, दम देणे, जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केलात तरी माल देत नाही असे वर्तन दुकानदारांमार्फत सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मोफत धान्याची थेट काळ्या बाजारात लिलाव होऊन सर्व साफ केले जाते. अश्या फसवणूक करणाऱ्या रास्ताभाव धान्य दुकानांवर कारवाई होणार का या कडे सर्वांचे लक्ष राहून आहे. भवानी पेठच नाही तर संपूर्ण सोलापूरसह जिल्ह्यात ही या काळ्याबाजाराची चर्चा जोरदार सुरू आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM सोलापूरात रेशनदुकानदारांची मुजोरी वाढली; ग्राहकांना देतात धमक्या

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update