son-kills-father-not-getting-married
Crime Maharashtra

मालेगाव तालुक्यात धक्कादायक घटना ; लग्न करून देत नाही म्हणून मुलाने केली वडिलाची हत्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

मालेगाव – लग्न करून देत नाहीत म्हणून एका तरुणाने पित्याची निर्घृण हत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे शुक्रवारी रात्री घडली. याबाबत असे की, माझे लग्न का करून देत नाही म्हणून जऊळका येथील प्रमोद धर्मा भारती वय २७ याने दि. ५ नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान वडील धर्मा भारती ( वय ६५) यांच्यासोबत वाद घातला. दरम्यान त्याने कुऱ्हाडीने डोक्यात व पायावर वार करून गंभीर जखमी केले.

हे वाचा – अनिल देशमुखांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी

            माहिती मृतकाची सून संजीवनी महादेव भारती या महिलेने जऊळका पोलिस स्टेशनला दिली. त्यावरून पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या धर्मा यांना अकोला येथील सर्वोपचार (Treatment) रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान धर्मा भारती यांचा रात्री दोन वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्यावरून पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा प्रमोद यास तत्काळ अटक केली. पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे व सहकारी करत आहेत.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews