IMG 20210511 WA0003
Maharashtra

भाजी मार्केट येथे आरोग्य शिबिरास नागरिकांचे उत्स्फूर्त सहभाग

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- गोलचावडी नागरीक आरोग्य केंद्र व प्रभाग क्रमांक 3 यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी पेठेत भव्य आरोग्य शिबीर घेण्यात आले. याशिबिरात नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, इतर लक्षणे असणाऱ्यांना शाकंभरी देवी मंदिरात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तपासणी करण्यात आले. शहरात सर्दी ताप खोकला वाढू नये यासाठी शहरभर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भवानी पेठेतील शाकंभरी देवी मंदिर परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले. याप्रसंगी गोलचावडी नागरिक आरोग्य केंद्राचे डॉ. अलकुंटे, सौ. मिनाक्षी जाधव, श्रीनिवास नराल, आशा वर्कर सौ. सुजाता तुरुप, सौ. सविता आडकी आदींनी तपासणी केले. या नागरी आरोग्य शिबिरास एकूण 170 जणांनी सहभाग नोंदवले आहे. सर्दी, खोकला, ताप आल्यास वेळेतच इलाज करा असे आव्हान डॉक्टरांनी केले.

याप्रसंगी लक्ष्मण पाटील, सदानंद कोरडे, सैपन हुंडेकरी, अंबादास नडीमेटला, चंद्रकांत रंगम, परशुराम संदूपटला, शंकर चनमल (बक्कणा), जगदीश कोरडे, नरेश नडीमेटला आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com