Solapur City

समस्त ब्राह्यण स्नेहमेळाव्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ; विविध स्पर्धातून लुटला आनंद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर – समस्त ब्राह्मण समाजतर्फे बुधवारी (ता.10) झालेल्या स्नेहमेळाव्यात महिलांनी उत्स्फूर्तपणे आनंद लुटला. यामधे शहराच्या विविध भागातील सुमारे 250 महिलांनी सहभाग नोंदवला. जुळे सोलापूर येथील द्वारकाधीश मंदिरात हा स्नेहमेळावा झाला. भगवान परशुरामाच्या पूजनाने मेळाव्याची सुरवात झाली. या वेळी प्रत्येक महिलेला वाण म्हणून जास्वंदाचे रोप भेट देण्यात आले. निसर्ग माझा सखा संस्थेने रोपांची व्यवस्था केली होती. यावेळी मनोरंजनात्मक वन मिनीट शो, बौद्धिक खेळ, उखाणे आणि इतर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी हरभरा डाळीपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांची एक मिनिटात जास्तीत जास्त नावं सांगणे, बौद्धिक खेळ, रांगोळीचे खेळ, एक मिनिटात जास्तीत जास्त उखाणे सादर करणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. ज्यांच्याजवळ वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आहेत अशा व्यक्तीला पाचारण करून त्यांच्या जवळ असलेल्या वस्तूंच्या नावांनी परितोपिके प्रदान करण्यात आली. वैशाली वळसंगकर यांनी मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि वाणाचं पावित्र्य याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. श्रद्धा केसकर, अनुजा कुलकर्णी, जयलक्ष्मी संगेवार, निशिगंधा तावेलदार या स्पर्धेतील विजेत्या ठरल्या. अखिल भाविक वारकरी मंडळाच्या महिलाध्यक्षा लता पाठक आणि दत्तात्रय पाठक यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.रातंजन ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चित्रा कवठेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका अनघा जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले. आश्लेषा निपुणगे यांनी आभार मानले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143