fbpx

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित

सोलापूर Sport – मूळचे सोलापूरचे थोरला मंगळवेढा तालिमचे प्रमुख पदाधिकारी व एस.टी.महामंङळात वाहतूक नियंत्रण पदावर नुकतेच सेवानिवृत्त झालेले बाळासाहेब बिङकर यांचे सुपुञ आणि सोलापूरचा अभिमान मुर्ती लहान किर्ती महान असलेला ऋतुराज बाळासाहेब बिङकर याची वाॕटरपोलो खेळ प्रकारात थेट भारतीय संघात निवङ करण्यात आली आहे.त्या बाबतचे भारताकङून स्विमिंग फेङरेशन आॕफ इंङिया निवङ प्रक्रियेचे अधिकृत पञ नुकतेच प्रसार माध्यमांपुढे जाहीर केले.

            Sport यामध्ये भारतीय संघात महाराष्ट्रातून दोघांची निवङ करण्यात आली आहे .त्यात सोलापूरची मान उंचावणारा ऋतुराज बाळासाहेब बिङकर याने आपल्या कौशल्यातून हे स्थान प्रस्थापित केले आहे.ऋतुराज ला लहानपणापासून विविध स्पर्धेत यशस्वी गरुङझेप घेण्याची सवय . त्यात आई-वङीलांची सुसंस्कृत शिकवण उत्तम संस्कार त्यामुळेच आज ऋतुराज ला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची उत्तम संधी मिळाली. Sport  ऋतुराज चे शालेय शिक्षण गांधी नाथा रंगजी विद्यालयात झाले.नंतर महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर काॕलेज या ठिकाणी झाले.सध्या तो MSC या शैक्षणिक वर्षाचे शिक्षण हे पुणे युनिव्हरसिटी सर परशुराम बहु महाविद्यालायातून घेतोय.गेल्या १० ते १२ वर्षापासून तो उत्तम सराव करतोय जिद्द ,चिकाटी ,अथक परिश्रम आणि आई-वङीलांचे उत्तम संस्कार या मुळेच तो आज उंच शिखरावर जाऊ पोहोचला आहे अस म्हणायला हरकत नाही.स्विमिंग ते वाॕटरपोलो हा प्रवास अथक परिश्रमाचा तो ऋतुने सहजपणे पार पाङला.आतापर्यंत .ऋतुने महाराष्ट्रातील मुंबई ,नाशिक,गोवा येथे झालेल्या विविध स्पर्धेत नाविण्यपूर्ण घवघवीत यश संपादन केले आहे.२०२१ साली गेट आॕफ इंङिया येथील सागरी जलतरण स्पर्धेत तर ऋतुने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे.ऋतुराज व त्याची बहिण ऋतुजा ही सुद्धा उत्तम स्विमिंग पटू खेळाङू आहे.ती सध्या BCA या शैक्षणिक वर्षात शिकत आहे.ऋतुराजला घङविण्यात आई-वङील,नातेवाईक ,सोबतच त्याचे गुरुवर्य शिक्षक सोलापूर जलतरण शिक्षक श्रीकांत शेटे,क्रिङाशिक्षक आनंद चव्हाण ,झुबिन अमेरिया ,सुदेश देशमुख यांचा खारीचा वाटा आहे.एका सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याचा गौरवाभिमान सुपुञ यशस्वी शिखरावर अथक परिश्रमाने आपले स्थान कशापद्धतीने स्थान प्रस्थापित करु शकतो हे एक आदर्शवत उदाहरण ऋतुराज च्या माध्यमातून समोर आलंय .आजच्या युवक पिढीने ऋतुराज चा आदर्श आत्मसात करावा अश्या प्रतिक्रिया आता व्यक्त केल्या जातायत .ऋतुराजच्या या यशाबद्दल बिङकर कुटुंबियांवर आता सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येतोय .आता ऋतुराज पुढील वाटचालीसाठी एशियन चँपियनशिप स्पर्धेसाठी साठी भारतीय संघाकङून लवकरच थायलंङ ला रवाना होणार आहे.
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update