fbpx
Sport department mobile app

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर Sport –  क्रीडा विभागाच्या मोबाईल ॲपमुळे खेळाडू व क्रीडा संस्था, मार्गदर्शक व पालकांना विभागामार्फत राबविले जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मिळेल. त्यासोबतच क्रीडा विभागाच्या कामात पारदर्शकता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले.

सर्व क्षेत्रात नवसंशोधन झाल्यास देश प्रगतीची शिखरे सर करील – राज्यपाल

                  Sport  डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत क्रीडा विभागाच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, सर्वश्री आमदार ना. गो. गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, सुनील केदार, समीर मेघे, राजू पारवे, मोहन मते, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, अॅड. आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, नियोजन उपायुक्त धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

                   जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालयाद्वारे  सुरु करण्यात आलेले  उपक्रम, क्रीडा विभागाच्या योजना, योजनांचे लाभार्थी, क्रीडा संकुले, Sport क्रीडा क्षेत्रातील अद्ययावत माहिती, क्रीडा पुरस्कार व पुरस्कारार्थींची माहिती, क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात राबविले जाणारे विविध उपक्रम या सर्व विषयांची माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वांकरिता  उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. Sport या संकेतस्थळ व मोबाईल ॲपमुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त खेळाडू तसेच पालक क्रीडा संस्थापर्यंत क्रीडा विभागाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून याचा लाभ खेळाडू, क्रीडा संस्था व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update