images 1
Crime Maharashtra

म्हणून अवैध धंदे राेखण्यासाठी या पाेलिस पथकांची निर्मिती

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मालेगाव- मालेगाव विभागातील अवैध धंदे राेखण्यासाठी विशेष पाेलिस पथकाची निर्मिती करण्यात आली अाहे. अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी शनिवारी (दि. २८) पथक नेमणुकीसंदर्भातील आदेश जारी केला आहे. मालेगाव शहर तसेच विभागात चाेऱ्या व घरफाेड्यांचे प्रमाण वाढले आहे. ही वाढती गुन्हेगारी आटाेक्यात ठेवण्यासाठी खांडवी यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. पथकप्रमुखपदाची जबाबदारी उपनिरीक्षक आर. के. घुगे यांच्याकडे देण्यात आली अाहे. पाेलिस कर्मचारी पी. के. बनकर, बी. एस. खैरनार, एस. पी. राठाेड व पी. बी. भाेये यांचा पथकात समावेश करण्यात आला आहे. पथकाने कारवाईंचा तपशील दरराेज सादर करावा, असे निर्देशही खांडवी यांनी दिले आहे. पथक, मालेगाव शहर, तालुका, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, सटाणा या भागातील अवैधधंद्यांना पायबंद घालणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर खांडवी यांनी स्थानिक पाेलिसांना कार्यक्षेत्रातील अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना केल्या हाेत्या. मात्र, कारवायांमध्ये सातत्य न राहिल्याने अखेर पथक निर्मितीचा निर्णय घ्यावा लागला आहे.
                                  पारदर्शकता गरजेची मालेगावी खाकीला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात तालुका पाेलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकास लाच स्वीकारताना अटक झाली हाेती. पवारवाडीच्या कर्मचाऱ्यावर लाचलुचपतने नुकतीच कारवाई केली. या कारवायांमुळे पाेलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. परिणामी पथकाला अवैध धंद्यांवर कारवाया करताना पारदर्शीपणा ठेवणे गरजेचे आहे. पथकाकडून कुठलाही गैरप्रकार हाेऊ नये, यासाठी खांडवी यांना पथकाच्या नियमित कारवाईंवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com