fbpx
st-staff-will-come-to-work-mesma

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

महाराष्ट्र Mesma – एसटीचे 22 हजार कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक बऱ्यापैकी सुरू झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील वाहतूक सुरू झालेली नाही. आतापर्यंत 10 हजार कर्मचाऱ्याचे निलंबन झाले असून निलबंनाची कारवाई बडतर्फीच्या दिशेने जाऊ शकते तर अडीच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली आहे. आम्ही वारंवार कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय की तुम्ही पुन्हा कामावर या. कारण कर्मचाऱ्यांचे नुकसान होतेय. ॲड.गुणरत्न सदावर्ते यांचे कोणतेही नुकसान होत नाही. सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत असल्याचा आरोप परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी रत्नागिरीत करताना एसटी ही सेवा क्षेत्रात येत असल्याने वेळ पडल्यास मेस्मा लावावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

माजी सैनिकांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सन्मान योजनेअंतर्गत मिळकत करात सवलत

              Mesma  दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड.अनिल परब रत्नागिरीत आले होते. पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आम्ही मान्य केल्या.पगारवाढ केली त्याचबरोबर दर महिन्याच्या दहा तारखेपूर्वी पगार देण्याचे मान्य केले.त्यानंतरही संप सुरू राहिला आहे.आता सदावर्ते यांनी 20 तारखेला एसटीचे सरकारमध्ये विलगीकरण करून देतो, असे सांगितले आहे. सदावर्ते हे कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत.कर्मचाऱ्यांचा दीड महिन्यांचा पगार बुडाला आहे.कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे असे परब यांनी स्पष्ट सांगितले.

किरीट सोमय्यांच्या विरोधात दावा

किरीट सोमय्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बंधनकारक नाही. ज्या ज्या एजन्सीनी मला प्रश्न विचारले त्यांना मी सर्व माहिती दिली आहे.त्यांचे समाधान झाले आहे. आता मी किरीट सोमय्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एक तर त्यांनी माफी मागावी नाहीतर मला 100 कोटी रूपये द्यावेत असे ॲड.परब यांनी सांगितले.

म्हणून स्थानिक निवडणूकीत आघाडी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. म्हणूनच दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे.हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य निवडणूकांमध्ये आघाडी पहायला मिळेल असे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी सांगितले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update