Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची कार्यवाही त्वरीत करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. पशुचिकित्सा व्यवसायी संघटना यांच्या प्रलंबित मागण्यांप्रकरणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली.बैठकीत पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने प्रलंबित मागण्यांप्रकरणी निवेदन सादर केले. पुण्याचे सहआयुक्त डॉ.सुनिल राऊतमारे, सहआयुक्त सुनिल गिरणे, अवर सचिव डॉ.शैलेश केंडे, पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे सरचिटणीस डॉ.एम.पी.कानोसे, अध्यक्ष डॉ.सुनिल काटकर तसेच संबधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, पशुधन पर्यवेक्षक संवर्गाला सलग 30 वर्ष सेवेनंतर मंजूर करण्यात आलेल्या तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीस स्थगिती देवून नियमानुसार सुधारित आदेश काढण्याबाबत कार्यवाही करावी. पशुधन विकास अधिकारी गट-अ सेवा प्रवेश नियम दुरुस्तीसंदर्भात कार्यवाही करावी. तसेच, पशुधन विकास अधिकारी गट-ब पदांच्या स्थान निश्चितीच्या निर्णयाला दिलेली स्थगिती उठविण्याबाबत आणि राज्यात पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करावी, असेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143
लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

