stand-firm-with-the-st-staff
Solapur City

एसटी कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही कायम खंबीरपणे उभे राहु – विक्रम देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर – संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे ८/१६/२४ टक्के तसेच सण, उच्चल १२५००/- रुपये मिळावा, राज्य सकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढीचा दर तीन टक्के प्रमाणे मिळावा, घरभाडे भत्ता मिळावा, दिवाळी भेट म्हणून रु.१५०००/- सानुग्रह अनुदान मिळावा अशा विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र एस.टी.कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलन स्थळी जाऊन भेट घेत व आंदोलनामध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी पाठिंबा दिला. यावेळी सभागृहनेते शिवानंद पाटील, नगरसेवक विनोद भोसले, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, सकल मराठा समाजाचे समनव्यक माऊली पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे वाचा – राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या

          संपूर्ण महाराष्ट्रातून नागरीकांना परगावी प्रवास करण्याकरिता जी प्रवास सेवा दिली जाते त्यामध्ये मोठया प्रमाणावर महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. आज आपले हे एस.टी.कामगार यांनी जर सेवा देणे बंद केले तर नागरीकांचे हाल बेहाल होऊ नये म्हणून ते सर्व सेवक प्रामाणिकपणे रात्रंदिवस व आपल्या कुटुंबाचा तसेच प्रकृतीचा विचार न करता अविरत सेवा देत असतात. तेंव्हा या सेवेपोटी त्यांना देण्यात येणारे वेतन हे अतिशय तुटपुंजे असून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणे क्रमप्राप्त व गरजेचे आहे. तोडगा काढण्याऐवजी कोणाचा तरी चुकीचा सल्ला एकूण निलंबनाच्या कारवाई होत राहीली तर हे आंदोलन आजून चिघळू शकते. हजारो लोकांच्या घरातील चूल पेटण्यासाठी आणि चांगला तोडगा काढण्यासाठी शासनाच्या सर्व लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर कायम खंबीरपणे उभे आहोत असे मत शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले. राज्य सरकार अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा जोपर्यंत हा संप मिटत नाही व आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे मनोज मुदलियार यांनी बोलताना सांगितले.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews