20201217 154029
Education/Collage/School Maharashtra

उच्चशिक्षण घेऊन विद्यार्थिनींनी आपल्या पायावर उभे रहावे- कुलगुरू डाॅ. रामा शास्त्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सिध्देश्वर वुमेन्स पाॅलिटेक्निकमध्ये सिध्द 2020 चे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

सोलापूर- सोलापूरातील सिध्देश्वर वुमेन्स पाॅलिटेक्निकच्या 11व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वार्षिकांक सिध्द 2020 चा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडले. कोविडसारख्या वातावरणात विद्यार्थीनींच्या विविध कलांना प्रसिध्दी मिळावी यासाठी बुधवारी सायंकाळी सिध्द 2020 वार्षिंकांक प्रकाशित करण्यात आले. विद्यार्थीनींच्या सर्वांगीण विकासासाठी जी मदत लागेल त्याची पूर्तता संस्था करेल अशी माहिती सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटिचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिले. वार्षिंकांकामध्ये वर्षभरातून जे विविध क्षेत्रातील लिखाण केलेले आहे त्या सर्व सहभागी विद्यार्थीनींचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे उद्धाटन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नालाॅजीकल विदयापीठ, लोणेरे चे कुलगुरू डाॅ. रामा शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटिचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची उपस्थिती होती. संस्थेचे अॅड. आर.एस. पाटील, शिवकुमार पाटील, सी.ई.ओ. सी.बी.नाडगौडा, सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे ऑफिस सेक्रेटरी निलकंठप्पा कोनापुरे, मल्लिकाुर्जन कळके, गिरीष गोरनाळी, सुभाष मुनाळे, विश्वनाथ लब्बा, बसवराज अष्टंगी, सिद्रामप्पा बमणी, भिमाशंकर पटणे, प्राचार्य गजानन धरणे सर्व सन्मानीय विश्वस्त उपस्थित होते.

              डाॅ. रामा शास्त्री यांनी, एन.बी.ए. मिळल्याबद्दल काॅलेजचे कौतुक केले. विद्यार्थीनींने आपले शिक्षण डिप्लोमा वरच न थांबाविता पुढचे उच्चशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे रहावे. कुठल्याही कामात ताण न घेता आपली कला आनंदाने द्विगुणीत करावी. नरेंद्र मोदी यांचे बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचे प्रत्युतर श्री सिध्देश्वर वुमेन्स पाॅलिटेक्निक व इंजिनिअरींग काॅलेजमध्ये बघण्यास मिळाले. वार्षिंकांक म्हणजे आपल्या सुप्त गुणांना वाव मिळण्याचे हे एक व्यासपीठ आहे. विद्यार्थींनींने दरवर्षी यामध्ये सहभाग नोंदवून आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करावा असेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. म्हैसुरच्या इन्फोसिस कंपनीमध्ये इलेक्ट्रीकल विभागातील कु. किर्ती कोसमी हीची निवड झााल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
                               या स्मरणिकेत मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, कला व क्रिडा असे विभाग असून या संदर्भातील लेख, कविता, विनोद, चारोळया, सादर करण्यात आलेत. वार्षिंकांकांचे मुखपृष्ठ कोरोनाविरुध्द लढा देणाऱ्यांना समर्पित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य टि.ए. चव्हाण, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि काही प्रमाणात विदयार्थिनीं आणि पालक यांची उपस्थिती होती. वार्षिकांकाचे कार्यकारी संपादक प्रा. वृषाली मोटगी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. श्रीशैल मळेवाडी यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. वृषाली मोटगी यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com