fbpx
images 3 हुतात्मा एक्स्प्रेस सह सोलापूर विभागातील सर्व प्रवासी रेल्वे गाड्या सुरू व्हावे
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून मार्च महिन्यापासून सोलापूरसह देशभरातील सर्व प्रवासी रेल्वेगाड्या बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्यास आता तब्बल आठ महिने होत आहेत. अनलॉकच्या अनुशंगाने देशभरात सर्व व्यवहार टप्प्या टप्प्यात सुरळीत सुरू आहे. सोलापूर विभागातील काही प्रवासी रेल्वे गाड्या पुन्हा एकदा सुरू करण्यात आले, पण सोलापूरकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची हुतात्मा एक्स्प्रेस अजून सुरू करण्यात आली नाही, ज्याचा प्रवाश्यांना इतर पर्यायी दळणवळण व्यवस्थेसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
                  गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना सोलापूरकरांच्या वतीने इमेलद्वारे विनंती करण्यात आली की, लवकरात लवकर हुतात्मा एक्स्प्रेससह सोलापूर विभागातील सर्व प्रवासी रेल्वे गाड्या पुन्हा एकदा त्यांच्या निर्धारित वेळेत्रानुसार सुरू करण्यात यावे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना विषाणु विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे सर्व सोलापूरकर तंतोतंत पालन करतील असे गिरिकर्णिका फाऊंडेशनने सर्व सोलापूरकरांच्या वतीने त्यांच्या इमेल निवेदनात नमूद केले. गिरिकर्णिका फाऊंडेशनने सोलापूरच्या विकाशी निगडित अनेक विषयांची सुयोग्य पद्धतीने हाताळणी केली जात आहे. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय केंद्रीय पातळीवरुन सोडविण्यासाठी फाऊंडेशनचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असुन, फाऊंडेशनने उचललेल्या अनेक विषयांना यश मिळाले आहे असे गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी स्पष्ट केले.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM हुतात्मा एक्स्प्रेस सह सोलापूर विभागातील सर्व प्रवासी रेल्वे गाड्या सुरू व्हावेडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update