fbpx
solapur city news 22 चर्नी रोड स्थानक पूल दुरुस्तीपर्यंत तात्पुरती तिकीट खिडकी तातडीने सुरु करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई – चर्नी रोड स्थानकाच्या रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम होईपर्यंत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती तिकीट खिडकी तातडीने सुरु करण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

भाविकांना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुविधा द्या

                     चर्नी रोड स्थानकातील रेल्वे पुलाच्या दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आलेल्या पुलाची नुकतीच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रईस शेख, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त परिमंडळ डॉ. संगिता हसनाळे, बृहन्मुंबई महानगरपालिकाचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) संजय महाले, मंडळ रेल्वे प्रबंधक (वेस्टन रेल्वे) मुंबई आवधिश वर्मा यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

1 1 4 चर्नी रोड स्थानक पूल दुरुस्तीपर्यंत तात्पुरती तिकीट खिडकी तातडीने सुरु करा

                  पालकमंत्री केसरकर म्हणाले, रेल्वे विभागाला तिकीट खिडकी सुरु करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. चर्नी रोड स्थानकातील उत्तर बाजूचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर उतरणारा पूल सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. येथे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी तात्पुरती तिकीट खिडकी सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update