Maharashtra

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून १४ पुस्तकांचे प्रकाशन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी कोरोनासारख्या महासंकटातदेखील सदर परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 14 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात येत आहे. या पुस्तकामध्ये श्रीमती मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाङमयातील खंड पहिला मंडळाने गतवर्षी प्रकाशित केला असून यावर्षी दुसरा खंड ग्रंथरुपाने मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे. महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हे विषय तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये उत्तमोत्तम ग्रंथ रचना करणे हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या वाङमयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङमयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध वाङमयीन योजनांबरोबरच उपरोक्त उद्दिष्ट पूर्तीसाठी मंडळाकडून सातत्यपूर्ण मौलिक ग्रंथांची निर्मिती करण्यात येत आहे.

                     मंडळाच्या महाराष्ट्राचे शिल्पकार योजनेअंतर्गत कमलाकर अंबेकर लिखित भारतरत्न नानाजी देशमुख व प्रा. चंद्रकुमार नलगे लिखित डॉ. ग.गो.जाधव यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारी, त्यांचे कार्य व योगदान मांडणारी चरित्रेदेखील मंडळ प्रकाशित करीत आहे. याबरोबरच भारतीय नाट्यशास्त्र, पाश्चात्त्य नाट्यशास्त्र आणि निवडक मराठी नाट्यरुपे संबंधित महत्त्वाच्या पारिभाषिक संज्ञांचा उलगडा करणारा, नाटक आणि रंगभूमीसाठी सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचा असणारा, अत्यंत मौलिक स्वरुपाचा नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह हा डॉ. विलास खोले यांचा ग्रंथ मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित होत आहे. या मराठी ग्रंथांसोबतच एकोणिसाच्या शतकात जर्मन आणि रशियन साहित्याच्या  इतिहासात मानाचे स्थान पटकावेल्या लघुकादंबऱ्यांची ओळख करुन देणाऱ्या सुनंदा महाजन व अनघा भट संपादित तिकडून आणलेल्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे मौलिक वाङमय देखील मंडळाकडून प्रकाशित होत आहे. याबरोबरच वाङमय महर्षी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या समग्र वाङमयातील गुरुवर्य केळुसकर यांचे डॉ. राजन गवस यांनी संपादित केलेले सेनेका व एपिक्टेटस यांची चरित्र व बोधवचने हे पुस्तक मंडळ प्रकाशित करीत आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com