Covid 19 Maharashtra

अखेर राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; उद्यापासून 1 मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध राहणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

महाराष्ट्र- राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. या नुसार, अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. पण, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येतील. तर, सर्व सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. तसेच, लग्नात 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळ मर्यादा दिलेली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. सदर नियमांमध्ये जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला असून, खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तर, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com