Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर State level – सोलापूर महानगरपालिका अंतर्गत मा महापौर व मा आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली “माझी वसुंधरा अभियान” व “राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रमाची” अंमलबजावणी करणेचे काम प्रगतीपथावर असुन शहरातील सौंदर्य वाढविणे करिता विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या भिंतीवर पर्यावरण संवर्धनबाबत विध्यार्थी व नागरिकांमध्ये जाणीवजागृती करणे करिता पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व वाढते प्रदूषणबाबत उपाय योजनाबाबत भित्तीचित्रे काढून शहर स्वच्छ, सुंदर व हरित करून जनजागृती करणेकरिता “राज्यस्तरीय पर्यावरणपुरक भित्तीचित्र स्पर्धा” चे आयोजन करण्यात येत आहे.
बेडर समाजातील जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नावनोंदणी सुरू- बाबुराव जमादार
State level स्पर्धेचे विषय
१.स्वच्छ,सुंदर व हरित सोलापूर.
२.माझी वसुंधरा संवर्धन
३.सोलापुरातील ऐतिहासिक वैभव
सदर स्पर्धेत सहभागी होणेकरिता खालील निकषांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
१.स्पर्धेतील सहभागी ग्रुप मध्ये जास्तीतजास्त ४ कलाकार सहभाग घेऊ शकतात.
२.स्पर्धेकरिता आवश्यक रंग व साहित्य हे स्वतःचे वापराणे आवश्यक आहे.
३. सदर स्पर्धेकरिता न जाणारे रंग (Acrelic/ Altima/ Mixmedia) वापरणे आवश्यक आहे.
४.स्पर्धेचा कालावधी हा सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच राहील त्यानंतर व त्याआधी
काढलेली किंवा रंगवलेली चित्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत.
५.सदर स्पर्धे करिता भिंतीची साईज ही ५x६ इतकी असेल त्यामध्येच चित्र काढणे
बंधनकारक आहे.
सदर स्पर्धेचे स्थळ रंगभवन चौक, सोलापूर येथे असुन स्पर्धेचा कालावधी हा दि. ३१/१२/२०२१ रोजी सकाळी ०७:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत राहील. सदर स्पर्धेकरिता स्पर्धकांनी env.smc@gmail.com या इमेलवर व ९६५७४२१०८१ या व्हाटसप नंबरवर लेखी स्वरुपात (याआधी केलेल्या तीन उत्कृष्ट कामासह) नोंदणी करणे आवश्यक असुन त्यावरून स्पर्धकांचे स्पर्धेतील सहभागाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचा निकाल जाहीर करणेकामी समिती गठीत करणेत येऊन सदर समितीकडून स्पर्धेतील सहभागी चित्रांचे दि.३१/१२/२०२१ रोजी प्रत्यक्ष भेट देवून निकषाप्रमाणे पाहणी करून गुणांकन देण्यात येणार आसून त्याप्रमाणे जास्तीत जास्त गुण प्राप्त करणाऱ्या स्पर्धकास अनुक्रमे प्रथम पारितोषिक र.रु.२५,०००/- द्वितीय पारितोषिक र.रु.१५,०००/- व तृतीय पारितोषिक र.रु.११,०००/- तसेच उत्तेजनार्थ र.रु.५०००/- एकुण ५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी सर्व चित्रकारांनी आपला सहभाग नोंदवावे. सदर स्पर्धेचे सर्व अधिकार हे मा. उपायुक्त, सोमपा. यांचेकडे राहतील.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews