Economy

‘लोकमंगल’चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर (प्रतिनिधी)- लोकमंगल वाचनालयाच्यावतीने दरवर्षी दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा मंगळवारी करण्यात आली. यंदाच्या वर्षी  विजेने चोरलेले दिवस – कादंबरी – संतोष जगताप – दर्या प्रकाशन, पुणे,  क्लोज एन्काऊंटर्स – ललित – पुरुषोत्तम बेर्डे – राजहंस प्रकाशक, पुणे,  सिनेमा पाहणारा माणूस – आत्मचरित्र – अशोक राणे – संधीकाल प्रकाशन, मुंबई तर साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार  यंदा मराठी अभ्यास परिषदेच्या ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकासाठी देण्यात येत आहे.  दरम्यान, या  वर्षीपासून दर दोन वर्षानी लोकमंगल परिवाराच्यावतीने नवोदित लेखक, कवींसाठी प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार  डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे, सोलापूर यांच्या ‘कैवार’, शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा या काव्यसंग्रहास देण्यात येणार आहे.या पुरस्काराचे लवकरच वितरण करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. 

                      यापूर्वी हा पुरस्कार नंदा खरे, सुहास बहुळकर, सुधीर रसाळ, आनंद कुंभार, प्रवीण बांदेकर, श्रीकांत देशमुख, सई परांजपे, गोपाळराव देशमुख, मकरंद साठे, गणेश मतकरी, मंगेश काळे, राजीव नाईक, ऋषिकेश गुप्ते, प्रफुल्ल शिलेदार, प्रा. द.तु. पाटील, शर्मिला फडके, विश्राम गुप्ते, मराठी भाषा आणि संशोधन मंडळाच्या मराठी संशोधन पत्रिका यांना देण्यात आलेला आहे. लवकरच प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीचे सदस्य  शिरीष देखणे, राज काझी (पुणे),  नितीन वैद्य आणि प्रा. डॉ. ऋचा कांबळे हे होते. या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली यांनी काम पाहिले आहे.  

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143