demand-not-accepted-indefinite-strike
Maharashtra

Kotwal Association : कोतवाल संघटनेचे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास १३ तारखेपासून बेमुदत संप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

पन्नास वर्षांपासून च्या चतुर्थ श्रेणी च्या मागणीला सरकारचा दुटप्पीपणा

राज्यातील सर्व कोतवाल मुंबई आझाद मैदानावर करणार आंदोलन

अक्कलकोट Kotwal Association –  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आंदोलना (protest) पाठोपाठ आता , महसूल विभागाचा कान, नाक, डोळे, समजले जाणारा तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकांच्या शंकेचे निर्सन करणारा ,महसूल विभागातील स्थानिक पातळीवरील महसूल गोळा करणे, गौण खनिजास आळा बसविणे, निवडणूक कामकाज, नैसर्गिक आपत्ती, पीक पाहणी, दुष्काळात नुकसान भरपाई पंचनामा चे सर्व्हे करणे, स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस पाटील व पोलीस प्रशासनास मदत करणे, वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांना सहाय्य करणे, अशा अनेक कामकाजात कोतवाल अत्यंत महत्त्वाचा घटक असून, हा कोतवाल गेल्या ६० वर्षांपासून चतुर्थ श्रेणी साठी सतत झगडत आहे.

         आजतागायत देखील कोतवालांना (Kotwal Association) न्याय मिळाला नाही. या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने कोतवाल बांधवांच्या मागण्या जर येत्या १२ तारखेपर्यंत मान्य न केल्यास १३ तारखेपासून मुंबई येथे राज्यातील १२६३६ हजार कोतवाल बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार केला असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालांचा विषय निकाली काढावा अन्यथा होणाऱ्या नुकसानी राज्य शासन स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यामुळे तातडीने बैठक लावून गेल्या पन्नास वर्षांपासून च्या मागणीचा निर्णय व्हावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे. कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणी देण्यात यावी. कोतवालांना तलाठी व तत्सम पदभरती मध्ये२५% आरक्षण देण्यात यावे. कोतवाल संघटनेस शासन मान्यता देण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी कोतवाल हे बेमुदत आंदोलनाच्या (protest) पवित्र्यात असून, या आंदोलना संदर्भात जुने पुरावे शासन निर्णयांचा संदर्भ घेऊन निवेदन देण्यात आले असून,ज्यामध्ये १९८० च्या दशकातील निवडणुकी पूर्वीचा वचननामा, १९८३ मध्ये तत्कालीन महसूलमंत्री यांनी चयुर्थ श्रेणी बाबत निर्णय घेण्याकरिता दिलेले पत्र, चतुर्थ श्रेणी ला मंत्रिमंडळाच्या मंजुरी एका महिन्याच्या आत सादर केले जाईल या संदर्भातील ३० मार्च २०११ रोजी च्या वर्तमानपत्रातील कात्रण , गुजरात राज्याने कोतवालाना चतुर्थ श्रेणी लागू केल्याबाबतच्या शासन निर्णयाची २० एप्रिल १९७९ रोजीची प्रत, २०१४ मध्ये कोतवाल यांना तलाठी आरक्षणाबाबत १०% आरक्षण देण्याबाबत बैठकीचे इतिवृत्त, यांसह विविध प्रकारचे पुरावे, शासन निर्णय , जोडून मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोतवाल संघटनेने लेखी निवेदन देत जर मागण्या येत्या १२ तारखेपर्यंत मान्य न झाल्यास १३ तारखेपासून बेमुदत संप करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

हे वाचा – सातारा आगाराची परिवहन सेवा हळूहळू पूर्वपदावर; 532 कर्मचारी हजर तर १२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

        कोतवाल यांना योग्य पध्दतीने काम करून सुद्धा त्यांना अद्याप पर्यंत समाधानकारक वेतन दिले जात नाही उलट शासन मानधनामध्ये कमी जास्त वाढ करून संघटने मध्ये व कोतवाला मध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरात व त्रिपुरा राज्यात कोतवाल याना चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी दर्जा देऊन न्याय द्यावा अशी मागणी संघटनेची आहे. राज्याध्यक्ष शिवप्रसाद देवणे, राज्य सरचटणीस कृष्णा शिंदे, उपाध्यक्ष संतोष ठाकूर, विभागीय अध्यक्ष सोमनाथ गवळी, विभागीय उपाध्यक्ष विवेकानंद पांचाळ, रोशन जोगे, उत्तम पाचभाई, राजकुमार साठे, शशिकांत निमसटकर, अंबादास यामजले, यांच्या स्वाक्षरी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी, सोलापूर जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, प्रवीण चिखलकर प्रसिद्धीप्रमुख प्रविणकुमार बाबर, गिरीष थेर, शफील वाडीकर, युवराज यादव , बाळा भोणकर, घनश्याम पटले, प्रकाश चनमवार, यांच्यासह कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews