Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन
नगर (शेवगाव)- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव एसटी आगाराचे कर्मचारी व राज्य परिवहन महामंडळाचे State Transport Corporation अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शेवगाव येथील एसटी कामगारांनी संप मागे घेतला आहे. वेळापत्रकानुसार शंभर टक्के बसेस पोलीस बंदोबस्तात मार्गावर सोडण्यात येणार असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी वासुदेव देवराज यांनी सांगितले आहे.
सोडण्यात येणार्या बसेस – तारकपूर ः नगर-संगमनेर (12 फेर्या), नगर-वांबोरी (12 फेर्या), तारकपूर-राशीन (4 फेर्या), नगर-पाथर्डी (8 फेर्या). शेवगावः शेवगाव-नगर (18 फेर्या), शेवगाव-संगमनेर (6फेर्या). जामखेडः जामखेड-नगर (4फेर्या), जामखेड-कर्जत (4फेर्या). श्रीरामपूरः श्रीरामपूर -कोपरगाव (8फेर्या), श्रीरामपूर -नगर (24फेर्या). कोपरगावः कोपरगाव-श्रीरामपूर (8फेर्या), कोपरगाव-संगमनेर (4फेर्या), कोपरगाव-नगर (12फेर्या). पारनेरः पारनेर-सुपा-नगर (6फेर्या), पारनेर-जामगाव-नगर (6फेर्या). संगमनेरः संगमनेर-नगर (10फेर्या). श्रीगोंदाःश्रीगोंदा-नगर (8फेर्या), श्रीगोंदा-कर्जत (6फेर्या). नेवासाः नेवासा-नगर((8फेर्या), नेवासा-शिर्डी. (8फेर्या).पाथर्डीःपाथर्डी-नगर(8फेर्या), पाथर्डी-शेवगाव (8फेर्या). अकोलेःअकोले-राजुर (10फेर्या), अकोले-संगमनेर (16फेर्या)अकोले-मोग्रस-कोतूळ (6फेर्या).
जलशक्ती अभियानाच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ८ नोव्हेंबर पासून संप straik सुरु केला होता. शेवगाव आगारातील २५९ कर्मचारी संपावर गेल्याने एसटीचे चाक थांबले होते. तसेच बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांचे व शाळकरी विद्यार्थ्यांचे अतोनात हाल सुरु होते. दरम्यान शुक्रवारी दुपारी विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधिकारी वासुदेव देवराज तसेच शेवगाव आगारातील कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचे व ज्या कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळणार नाही त्यांना देण्यात येणार असल्याचे ठरले आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप लबडे यांनी आम्हाला वाढून दिलेली पगार वाढ मान्य असून निलंबन आदेश मागे घेण्याचे तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळणार नाही त्यांना हजेरी देण्याच्या अटीवर संप शेवगाव आगारापुरता मागे घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे. संप मागे घेताच कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरुवात झाली असून वेळापत्रकानुसार एसटीच्या बसेस वेगवेगळ्या मार्गावर पोलीस बंदोबस्तात सोडण्यात सुरवात झाली आहे. १०० टक्के मार्गावरील बसेस आज पासून १८ दिवसांनंतर रस्त्यावर धावणार आहेत. सर्वसामान्यांची लालपरी lalpari सुरु झाल्याने प्रवाशी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून शाळकरी विद्यार्थ्यांचा शाळेत येण्या-जाण्यासाठीचा प्रवासाचा प्रश्न सुटला आहे.
अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143
#solapurcitynews