stop illegal fuel sales and counterfeit biodiesel sales
Crime

अवैध इंधन विक्री आणि बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- राज्यातील अवैध इंधन आणि बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम आखून त्यानुसार जिल्हा स्तरावर पथके स्थापन करणे गरजेचे आहे. अवैध इंधन विक्रीमुळे केंद्र शासन व राज्यशासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करुन अवगत करणे गरजेचे आहे.राज्यातील अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीने वाढवावी, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मंत्रालयात राज्याचे बायोडिझेल (उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री) धोरण 2021 बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी बायोडिझेलचे अवैध उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री करण्याऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. राज्यातील बंदरांच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध आयात तसेच साठवणूक, पुरवठा व विक्री करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढवावे.

             केंद्र सरकारने केवळ ब्लेंडिंगसाठी फ्युअल ऑईल मिश्रित बायोडिझेल विकण्याची परवानगी दिली आहे. सोबत अट घातली आहे की पेट्रोल-डिझेल पंपासारखे बायोडिझेल पंप उघडण्यासाठी परवाना व मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक लोक विना परवाना व मंजुरी न घेता बायोडिझेल पंप सुरू करीत आहे. येथे ब्लेंडिंग न करता पूर्ण टाकी बायोडिझेलने भरण्यात येत आहे. परवानगी नसतानाही विना परवाना बायोडिझेल विक्री करण्यात येत असल्याने शासनाचे वर्षाला हजारो कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. जिल्हास्तरावर पथक नेमून पथकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात तपासणी मोहीम काटेकोरपणे राबवून अवैध बायोडिझेल, बनावट डिझेलची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कारवाई करावी व त्याचा अहवाल शीघ्रतेने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असेही निर्देश भुजबळ यांनी दिले. केंद्र शासनाने बायोडिझेल संदर्भात धोरण निश्चित केले असून त्याची अंमलबवणी करणे गरजेचे आहे. यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.यासंदर्भात मोहिम आखून या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. बायोडिझेल धोरणाची अंमलबजावणी करायची असेल तर संबंधितांवर या प्रकरणामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे.

हे वाचाएसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी

          केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करुन बायोडिझेलचे अवैध उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री यामुळे केंद्र व राज्याच्या कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे हे अवगत करावे तसेच ज्वालाग्रही पदार्थांची विनापरवानगी विक्री करत असतील  तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे निर्देश भुजबळ यांनी दिले. तेल उद्योगाचे राज्य समन्वयक यांनी परदेशातून बंदरांद्वारे राज्यामध्ये येणारे अवैध बायोडिझेलसदृश्य केमिकलमुळे देशाचे व राज्याचे होणारे नुकसान या संदर्भात माहिती दिली. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, शिधावाटप संचालक कान्हूराज बगाटे, कोकण विभागाचे पुरवठा उपायुक्त विवेक गायकवाड, औरगाबाद विभागाचे पुरवठा उपायुक्त वामन कदम, पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ.त्रिगुण कुलकर्णी, उपनियंत्रक शिधावाटप प्रशांत काळे, उपनियंत्रक लिलाधर दुफाटे, नाशिक विभागाचे साहेबराव सोनवणे, तेल उद्योग विभागाचे राज्य समन्वयक सतीश निवेदकर, मुख्य प्रबंधक राज्य समन्वयक मनोहर अंभोरे, महाप्रबंधक रिटेल सेल्स इंडियन आईल कं.लि.शशांक मेश्राम,  मुख्य प्रबंधक रिटेल सेल्स इंडियन ऑईल कॉ.लि प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143