Electricity Maharashtra

ठाण्यातील पोखरण रोड-१ वरील स्ट्रीट आर्ट गॅलरीची दुरवस्था,मनसेचे आंदोलन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे- उद्घटनानंतर गेले ३ वर्षपासून धूळ खात पडलेल्या ठाणे महापालिकेच्या स्ट्रीट आर्ट गॅलरीच्या दुरवस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ३ वर्षे पूर्वी तब्बल १७ लाख रुपये खर्च करून ठाणे महानगरपालिकेने पोखरण रोड १ येथील सिंघानिया शाळेच्या बाहेरील पदपथावर स्ट्रीट आर्ट गॅलरी निर्माण केली होती. मनसेचे प्रसाद भांदिगरे यांनी सातत्याने या प्रकारणाचा पाठपुरावा करुन महानगरपालिकेला गॅलरीचे उदघाटन करायला भाग पाडल होत. परंतु त्या नंतर गेले ३ वर्षांपासून ही आर्ट गॅलरी अशीच धूळ खात पडली आहे. या आर्ट गॅलरीच्या दुरवस्थेबाबत ठाणे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या आदेशाने व ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मनविसेच्या कार्यकर्त्यांनी आर्ट गॅलरी बाहेर निदर्शने करून आंदोलन केले.
                             यावेळी दूरावस्थेत असलेल्या आर्ट गैलेरीची सफाई करण्याचा प्रयत्न म न वि से कडून करण्यात आला तसेच काही कलात्मक चित्र व व्यंगचित्र देखील लावण्यात आली. या प्रसंगी बोलताना अरुण घोसाळकर यांनी महापालिकेने CCTV कॅमेरे व सुरक्षा रक्षकांची नेमणूक आर्ट गॅलरीसाठी करावी अशी मागणी केली. जर महानगर पालिकेला असे उपक्रम झेपत नसतील तर महापुरुषांची माहिती देणारे फलक सिंघानिया शाळा येथील आर्ट गॅलरी मध्ये लावण्यात यावे जेणे करुन येणाऱ्या लहान मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार होतील व महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात अंकिता सारंग, काजल डावखर, प्रसाद भंगीदारे, नीलम भोईर, प्रितेश मोरे, इशिका सावंत, वैष्णवी परिख, नवीन कोळी, जितेश रायकर, तन्मय कोळी, सागर कदम, ओमकार महाडिक, प्रवीण बेलोसे, विरेश मयेकर, रुपेश साबळे, सुरज कदम, प्राणिल वाघमारे, अनिकेत चिरनरकर, आकाश चौधरी, विशाल पाटिल, रोशन वाडकर, अभिषेक देशमुख, यज्ञेश दौंड, साहिल चौधरी, शुभम नाईक आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143