Maharashtra

आजपासून जिल्हाबंदी शक्य, रात्रीपासून कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी; मुख्यमंत्री आज संवाद साधणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

महाराष्ट्र- कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही लोक सर्रास रस्त्यावर गर्दी करीत असल्याने राज्यात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन करण्याचा एकमुखी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी लाॅकडाऊनची एकमुखी मागणी केली. राज्यव्यापी लाॅकडाऊमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध टाकण्यात येणार आहेत. जिल्हाबंदीसुद्धा केली जाऊ शकते तसेच मुंबईची लोकल केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

             मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी राज्याला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री त्या जनसंवादामध्ये लाॅकडाऊनची घोषणा करतील, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन करावा, अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी बैठकीत मांडली. या बैठकीला राज्यमंत्र्यांना बोलवण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वत्रिक लसीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कितीही खर्च येवो, पण लवकरात लवकर राज्यातील नागरिकांचे लसीकरण केले पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली. राज्य सरकारच्या मालकीचा किमान शंभर टन क्षमतेचा आॅक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तातडीने स्थापन केला पाहिजे, अशी मागणी नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केली. कोरोना रुग्णांना सोयीसुविधा पुरवण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याने सरकारविरोधात संताप वाढतो आहे. त्यामुळे बिथरलेल्या मंत्र्यांनी लाॅकडाऊनचे हत्यार उपसून काहीशी उसंत मिळवण्याचा बैठकीत प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनचा कालावधी नेमका कधीपर्यंत असेल याबाबत संभ्रम आहे.

किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी सकाळी फक्त ४ तास उघडे
राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, खाद्यपदार्थांची सर्व दुकाने, कृषी उत्पादनाशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील. मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देता येईल.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com