Crime

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिला-भगिनींच्या पाठीशी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अमरावती- महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा संवाद राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला.

                 मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, वरिष्ठांकडून होणारा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला व महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपवनसंरक्षक अविनाशकुमार, नवलकिशोर रेड्डी, पीयुषा जगताप आदी यावेळी उपस्थित होते. महिला व बालविकासमंत्र्यांनी धारणी तालुक्यातील मांगीया, हरिसाल, बोरी, लवादा, चित्री, चिखलदरा तालुक्यातील जैतादेही, मोथा, आमझरी, शहापूर या गावांबरोबरच अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील धारगड येथेही भेट दिली.

अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा

महिला वनकर्मचाऱ्यांना कुठलीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. माझ्या फेसबुक पेजवर मोबाईल नंबर जाहीर केला आहे. मला व्हाट्सॲपवर संदेशही पाठवता येईल. निर्भिडपणे आपली समस्या मांडा. अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, असा संवाद त्यांनी महिला-भगिनींशी साधला.

मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

विशेष व्याघ्र संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा, बालसंगोपन रजा केंद्राप्रमाणे महिला वनकर्मचाऱ्यांनाही मिळावी व इतरही समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असा दिलासा महिला व बालविकास मंत्र्यांनी यावेळी दिला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com