Subhash Deshmukh's Tourism
Solapur City

आ. सुभाष देशमुख यांचा पर्यटन दिन दौरा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – मा. आमदार सुभाषबापू देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी, सोमवार दि. २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिनाला, सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे. जिल्ह्यात पर्यटन स्थळे म्हणून विकसित करता येतील अशा गावांत हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या निमित्ताने ते भंडीशेगाव, वडवळ, भेंड आणि मारापूर, चिंचणी या गावांना भेटी देतील. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असेल. आ. सुभाष देशमुख यांचा पर्यटन दिनाचा दौरा सकाळी ९ वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे गावापासून सुरू होईल. नंतर ते मंगळवेढा तालुक्यातल्या मारापूर-तावशी येथे आयोजित पर्यटन विषयक परिसंवादात सहभागी होतील. हा परिसंवाद ११ वाजता सुरू होईल. या गावाजवळ नदीच्या पात्रात असलेल्या प्राचीन बिंडप्पा बेटाच्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल.

                          दुपारी १ वाजता ते पंढरपूर तालुक्यातल्या भंडीशेगाव येेथे येऊन तिथल्या ड्रीम गार्डनची पाहणी करतील. हे उद्यान तिथे ४२ एकर जागेवर साकारलेले आहे. आमदार देशमुख तिथे छत्रपती उद्यान आणि बुद्ध पार्काची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधतील. २ वाजता ते चिंचणीला भेट देतील. चिंचणी हे राज्यात नावाजले गेलेले आदर्श गाव आहे. तिथे त्यांचा वनसंवाद कार्यक्रम व स्नेहभोजन होईल. दुपारी ४ वाजता माढा तालुक्यातल्या भेंड गावाला भेट देतील. या गावाला आर आर आबा आदर्श गाव पुरस्कार मिळालेला आहे. तिथे ते संत सावता माळी यांच्या मावशीच्या समाधीला भेट देतील. तर ५.३० वाजता ते मोहोळ तालुक्यातल्या वडवळ गावाला भेट देतील. धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात नागनाथ महाराज मंदिराची पाहणी आणि ग्रामस्थांशी संवाद असा हा दिवसभराचा कार्यक्रम असेल, यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्याला शक्य असेल त्या पर्यटन ठिकाणांना भेटी द्याव्यात व त्याचे छायाचित्र फाउंडेशन कडे पाठविण्यात यावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143