FB IMG 1630863627859
Maharashtra Solapur City

लिंगायत समाजातील सुदीप चाकोतेंचा ‘महात्मा बसवेश्‍वर जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- महाराष्ट्र राज्य वीरशैव शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी कल्याणकारी मंडळातर्फे रविवारी सामाजिक कार्यकर्ते सुदीप चाकोते यांना महात्मा बसवेश्वर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निस्वार्थ भावनेने समाजाचे कल्याण करण्याचा मार्ग महात्मा बसवेश्‍वरांनी जगाला दाखवून दिला आहे. हाच खरा वीरशैव सिद्धांत आहे. हा सिद्धांत समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामीजी यांनी यावेळी केले.
       महाराष्ट्र राज्य वीरशैव शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी मंडळातर्फे यावेळी ब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना लोकाभिमुख प्रशासन प्रमुख सन्मानपत्र देण्यात आले. फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामीजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, सुदीप चाकोते, शिवसेनेचे शहरप्रमुख आणि नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हत्तुरे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, मंडळाचे अध्यक्ष शिवानंद भरले, सचिव बसवराज दिंडोरे, उपाध्यक्ष काशिनाथ घोंगडे, कोषाध्यक्ष अनिल बिराजदार, सूर्यकांत हत्तुरे, उपस्थित होते.
             यावेळी लोकाभिमुख प्रशासन प्रमुख सन्मानपत्र देऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा तर महात्मा बसवेश्‍वर जीवन गौरव पुरस्कार देऊन सुदीप चाकोते यांचा सत्कार करण्यात आला. फेटा, पुष्पकार, शाल, सन्मानपत्र, महात्मा बसवेश्‍वरांची मूर्ती असे या सत्काराचे स्वरूप होते. यावेळी जि.प. सदस्य उमेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, सामाजिक कार्यकर्ते सुदीप चाकोते यांनी मनोगत व्यक्त केले. नागेश बसाळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रास्ताविक तर सिद्धेश्‍वर दसाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

जीवनगौरव पुरस्काराने यांचाही झाला सन्मान
गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्‍वर निंबर्गी, एपीआय शरणप्पा मनगाणे, नायब तहसीलदार सुनिल मुनाळे, समीर कुंभार, गुरूसिद्धय्या हिरेमठ, शिक्षिका अंजली शिरसी, शिक्षक सुहास उरवणे, सुनिल डिगोळे, महेश शेंडे, ग्रामसेविका

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143