Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सातपूर- सर्वसामान्य नागरिक सामाजिक व आर्थिक संकटावर कशीबशी मात करत असतानाच त्यांच्यामागे आता फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीचा तगादा सुरू केला आहे. या जाचाला कंटाळून सातपूरच्या तरुणाने आत्महत्या केली. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्यांनी नियुक्त केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून कर्जदारांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. याचाच परिपाक म्हणून धास्तावलेला सातपूर कॉलनीतील व्यावसायिक योगेश हनुमंत जाधव (४२) याने शुक्रवारी (दि. २७) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेशला एका खासगी फायनान्स कंपनीकडून वसुलीसाठी त्रास दिला जात होता. काही लोक वसुलीसाठी गुरुवारी त्याच्या घरी येऊन गेले होते, अशी तक्रार त्याच्या नातलगांनी केली. मृत योगेश जाधव यांचर आनंदछाया भागात इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय होता. लॉकडाऊनमुळे काही महिने दुकान बंद होते. त्यामुळे त्याला कर्जाचे हप्ते भरण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यात कंपनीकडून कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात हाेता.
गुन्हा दाखल करा
लॉकडाऊनमुळे वित्तीय कंपन्यांनी वसुलीसाठी तगादा लावू नये, असे शासनाचे आदेश असतानाही काही खासगी फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी कर्जधारकांना त्रास दिला जात आहे. याच त्रासामुळे योगेशने आत्महत्या केली असून त्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या लोकांची कसून चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक सलीम शेख व योगेश शेवरे यांनी सातपूर पोलिसांकडे केली आहे. निवेदनावर प्रकाश निगळ, अंबादास आहिरे, विजय अहिरे, बंटी लभडे, वैभव महिरे, योगेश पाटील, नाना आव्हाड, सचिन सिन्हा, ज्ञानेश्वर बगडे, प्रवीण ढेरंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143