Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर OBC- दक्षिण तालुक्यात भाजपमध्ये ओबीसी समाजातील युवक आणि कार्यकर्ते सहभागी होत आहे. त्यामुळे तालुक्यात पक्ष वाढत आहे. आगामी सर्व निवडणुकांत भाजप निश्चित यश मिळवेल. या समाजाच्या पाठिंब्यामुळे दक्षिण तालुका काँग्रेस मुक्त करू, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूरची ओबीसी OBC सेलची बैठक विकास नगर सोलापूर येथे झाली, या बैठकीत आ. सुभाष देशमुख बोलत होते. या बैठकीत ओबीसी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. आ. देशमुख म्हणाले, जो पर्यंत जो ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र करू. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजावर राजकीय सुड घेण्याचा प्रयत्न करत आहे.महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव राज्यसरकार करत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी OBC समाजाला सर्वाधिक जागा देण्याचे काम भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील करत आहेत. दक्षिण सोलापूर मधून देखील जास्तीत जास्त जागा ओबीसी समाजाला देण्यात येतील, असे आ. देशमुख म्हणाले बैठकीचे प्रास्ताविक ओबीसी आघाडीचे अध्यक्ष रायाप्पा बन्ने यांनी केले. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाला सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचे काम केले, असे मत ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी यांनी मांडले.या बैठकीस तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी, पक्षनेते अण्णाराव बाराचारे, गजानन भाकरे, पं.स.संदीप टेळे, यतिन शहा, अप्पासाहेब मोटे, दिपाली व्हनमाने, अंबिका पाटील, गौरीशंकर मेंडगुदले, अतुल गायकवाड, मधुकर चिवरे, सिद्धाराम हेले, ईरेश अंबारे, विश्वनाथ हिरेमठ, ईराप्पा बिराजदार, सागर खांडेकर, महेश पुजारी, अब्दुल मजीद पटेल, प्रभाकर बिराजदार, सचिन पाटील, शामराव हांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन अप्पासाहेब मोटे यांनी तर आभार अंबिका पाटील यांनी मानले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews