CB
Food

शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना देण्यात आलेली स्थगिती उठविणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यावर 2018 मध्ये स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठविणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नवीन अधिकृत स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्याबाबत धोरण, राज्यातील रद्द केलेली स्वस्त धान्य दुकाने, शहरी भागात नवीन दुकानांना देण्यात आलेली स्थगिती आदि विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव मनोज सुर्यवंशी, सहसचिव चारुशिला तांबेकर व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

               शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना देण्यात आलेली स्थगिती आता उठविण्यात येणार आहे. संपूर्ण शहर आणि लगतची उपनगरे यांचा विचार करुन शहरातील रास्त भाव धान्य दुकानांची स्थळ निश्चिती करण्यासाठी आराखडा तयार करावा. या आराखड्यावर प्रचलित दुकाने, बंद असलेली दुकाने, प्रस्तावित दुकाने अशी सर्व दुकाने प्रथम एकांकासह नोंदवावी, असे निर्देश भुजबळ यांनी दिले. ग्रामीण भागात महसुली गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन स्वस्त धान्य दुकाने मंजूर करणे तसेच रद्द करण्यात आललेल्या दुकांनासाठी जाहीरनामे काढण्यात यावेत, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com