Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
कर्जत- तालुक्यात गस्त घालत असताना पोलिसांनी तलवार, टाटा सफारी कारसह एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात पोलिस गस्त करीत असताना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास बारडगाव-राशीन रस्त्यावर पोलिस पथक असताना मागून टाटा सफारी वाहन (MH 12 GK 3771) भरधाव वेगाने राशीनच्या दिशेने जाताना त्यांना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी धुमकाई फाटा या ठिकाणी सफारी कार अडवून त्यात फक्त वाहन चालवणाऱ्यास नाव विचारले असता त्याने आपले नाव उमेश भाऊसाहेब म्हस्के वय ३७ वर्षे, रा. तळवडी, ता. कर्जत असे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी कारची झडती घेतली असता मधील बाकावर एक लोखंडी तलवार मिळून आल्याने पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेऊन कर्जत पोलिस ठाण्यात पो. कॉ. गणेश ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. ही कारवाई पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, हेडकॉन्स्टेबल तुळसीदास सातपुते, कॉन्स्टेबल सचिन वारे या पथकाने केली आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143
लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

