Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी किवळे, पुणे येथील सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाला भेट दिली आणि विभाग प्रमुख व शिक्षकांशी संवाद साधला. कौशल्य शिक्षण ही काळाची गरज असून युवकांना रोजगारक्षम, स्वयं-रोजगार निर्माते, व उद्यमशील बनविण्यासाठी राज्यातील पहिले कौशल्य विद्यापीठ असलेले सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक शिक्षण विद्यापीठ अतिशय चांगले कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाचे ध्येय्य प्राप्त करण्यासाठी सर्व अध्यापक मंडळींनी एकदिलाने योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
सिंबायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ शांताराम मुजुमदार, प्र-कुलपती स्वाती मुजुमदार व कुलगुरु डॉ अश्विनी कुमार शर्मा यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठाच्या रिटेल सेंटर, ब्युटी ॲण्ड वेलनेस सेंटर तसेच अभियांत्रिकी कौशल्य केंद्राला भेट दिली.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143