Environment Maharashtra

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी न्यायालयानं दिला लॉकडाऊनचा सल्ला

नवी दिल्ली-  देशभरात मागील काही काळापासून कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. दररोज जवळपास चार लाख नवे रुग्ण समोर येत आहेत. अशात परिस्थितीत कोरोनासोबत लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सरकारला अनेक महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. न्यायालयानं कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचा सल्लाही दिला आहे. याशिवाय लस खरेदीची पॉलिसीही पुन्हा एकदा बदलण्यास न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायालयानं असं म्हटलं आहे, की जर […]

Covid 19 Crime Maharashtra

मुंबईत लग्न पडले महागात; आयोजकावर गुन्हा तर वधू वराला 50 हजारांचा दंड

मुंबई-  मुंबईत एका हॉलवर मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या बाबुलनाथ मंदिराजवळ असलेल्या संस्कृती हॉल मध्ये कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करुन लग्न सोहळा सुरू होता. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली असता डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संस्कृती हॉलवर धाड टाकली. यावेळी सदर ठिकाणी विवाह सोहळा सुरू होता आणि तेथे तब्बल 150 नागरिक उपस्थित असल्याचे आढळून […]

Covid 19 Maharashtra निधन वार्ता

महाराष्ट्रात मृतांच्या संख्येने पुन्हा चिंता वाढवली

मुंबई- maharashtra राज्यात नव्याने बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येने पुन्हा एकदा 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. केवळ बाधितांचा आकडा मोठा नाही तर मृतांच्या death संख्येतही वाढ होत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे वाढत्या रुग्ण संख्येला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. मात्र, ही रुग्ण संख्या काही कमी […]

Maharashtra

मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर सही झालीय, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील- अजित पवार

मुंबई-  कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. आता 1 तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, राज्यात लशी तुटवडा असल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा यावर भाष्य करण्याचे टाळले असून ‘उद्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या  बैठकीत लसीकरणावर निर्णय घेतला जाईल’, असं उत्तर दिले आहे. राज्यात 1 तारखेपासून लसीकरण […]

Covid 19 Maharashtra

प्रवासाआधी होते निगेटिव्ह; प्रवासादरम्यान 52 जणांना कोरोना

नवी दिल्ली- जगभरात कोरोनाने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावले आहे. लोकांना अत्यावश्यक सेवांशिवाय बाहेर पडू नका असं आवाहन शासनाकडून केलं जात आहे. नव्या नियमावलींमुळे प्रवासावरही बरेच निर्बंध आले आहेत. प्रवास करण्यापूर्वी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पण […]