nashik1 1 750x375 1
Economy Maharashtra Solapur City

सुरगाणा तालुक्यातील लघुपाटबंधारे व प्रवाही वळण योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नाशिक- सुरगाणा तालुका हा विक्रमी पर्जन्यवृष्टीचा प्रदेश आहे. ‘पाणी आडवा व पाणी जिरवा’ या भूमिकेतून प्रथम येथील स्थानिकांची पाण्याची गरज प्राधान्याने पूर्ण करून सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भागाच्या विकासासाठी लघुपाटबंधारे व प्रवाही वळण योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, सुरगाणा तालुका हे सर्वाधिक पर्जन्यलाभ क्षेत्र असूनही  येथील पाणी  वाहून जाऊन पश्चिमेकडील समुद्रास  मिळते. त्यामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलाचा प्रवास करावा लागतो. या ठिकाणी लघु पाटबंधारे सारख्या योजना केल्या तर स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न तर सुटेलच त्यासोबत पाण्याची उपलब्धता होऊन नळपाणी पुरवठा सारख्या योजना सुद्धा या भागात सुरू करता येतील. स्थानिकांचा पाणीप्रश्न सुटल्यानंतर उर्वरित पाणी पश्चिमेकडे वळविता येईल. या कामासाठी पूर्णवेळ स्वतंत्र मुख्य अभियंता व संबंधित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

             गेल्या काही महिन्यांपासून देश कोरोनाच्या सावटाखाली असून आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते आहे. लवकरच प्रलंबित असलेली विकास कामे सुद्धा आता सुरू करता येतील. पाण्याचे महत्त्व येथील स्थानिक शेतकऱ्यांना समजले असल्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनी स्वमालकीच्या जमिनी बंधारा बांधणीसाठी देऊन मोठे योगदान दिले आहे. ज्या शेतकऱ्यांनी  स्वत:च्या जमिनी  पाणी  बंधाऱ्यासाठी  दिल्या आहेत, त्यांचे पुनर्वसन करून जमिनीचा योग्य मोबदला त्यांना दिला जाईल, असेही जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. पाणी बंधारा प्रकल्पासाठी स्वत:ची दहा एकर जमीन शासनास उपलब्ध करून देणारे शेतकरी श्री.रमेश सिताराम गवळी यांचा यथोचित सत्कारही यावेळी  जलसंपदा मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, पाणी प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांचे जेवढे कौतुक व आभार व्यक्त  करावे तेवढे कमीच आहे. तसेच या आदिवासी भागात लघु पाटबंधारे प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न दूर होऊन खरीप हंगामानंतर उर्वरित आठ महिन्यांसाठी घाटमाथ्यावर  रोजगारासाठी  होणारी स्थानिकांची भटकंती थांबेल; तसेच सदर प्रकल्प जलदगतीने पूर्ण होऊन आदिवासी बांधवांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, असा विश्वासही विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केला.

               काल सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन लघुपाटबंधारे योजना पाहणी दौऱ्याप्रसंगी मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार सुनील भुसारा, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे सचिव तथा कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक टी. एन. मुंढे, मुख्य अभियंता अनंत मोरे, मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, विजय घोगरे, कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.

 

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com