fbpx
IMG 20210405 WA0008 1

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर- केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महामार्गाच्या व्हिजनमधून सोलापूर जिल्ह्याला झुकते माप मिळाले आहे. जिल्ह्यातील एकूण सहा महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली असून यात आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे मोहोळ ते  तांदुळवाडी या महामार्गाला  पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. निधी दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी ना. गडकरी यांचे आभार मानले आहेत.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी रविवारी राज्यातील 829 कि.मी.च्या तब्बल 54 प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यासाठी तब्बल 4 हजार 590 कोटी रूपये दिले. यात सोलापूर जिल्ह्यातील सहा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये आ. सुभाष देशमुख यांनी पाठपुरावा केलेल्या मोहोळ- कुरूल- कामती- कंदलगा- – मंद्रूप- बसवनगर- तेरामैल – कणबस -आचेगाव-कणबस-धोत्री- तांदुळवाडी या  महामार्गाचाही समावेश आहे.  या महामार्गासाठी आ. देशमुख हे गडकरी यांच्याकडे 2015 पासून पाठपुरावा करत होते. अखेर आज त्याला पहिल्या टप्प्यात 54 कोटी 7 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर झालेल्या प्रकल्पामुळे  दळणवळणाच्या सुविधा वाढणार आहेत. हा प्रकल्प मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी  ना. गडकरी यांचे आभार मानले आहेत.

सर्व गावांचा चेहरा बदलणार
नितीन गडकरी यांच्या कामाचे संपूर्ण देशातून कौतूक होत आहे. त्यांच्याकाळात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार कामे होत आहेत. मोहोळ ते  तांदुळवाडी महामार्गाला 54 कोटींचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. या रस्त्यांमुळे या सर्व गावांचा चेहरा बदलणार आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update