IMG 20210408 WA0030
Election Maharashtra Solapur City

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीला धडा शिकवाः आ. सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

भाजप उमेदवार समाधान आवताडेंच्या प्रचारार्थ सभा
सोलापूर : महाआघाडी सरकार जनतेचे शोषण करणारे  सरकार आहे. वीज बिलाच्या बाबतीत देखील या सरकारने शब्द मोडला. विधान भवनात आम्ही केलेल्या आंदोलनामुळे काही दिवस वीज तोडणी बंद केली नंतर पुन्हा अधिवेशन संपल्यावर सर्वसामान्य शेतकर्‍यांची वीज तोडण्यात आली.  या सरकार ला धडा शिकवण्यासाठी मंगळवेढा- पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांना विजयी करावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले.
                     तावशी (ता. पंढरपूर) येथे आवताडे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत आ. देशमुख बोलत होते.  यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.  महाआघाडी सरकार आल्यापासून जनतेवर, शेतकर्‍यांवर कोणत्या ना कोणत्या कारणाने अन्याय सुरू आहे.  त्यांना आता या निवडणुकीत धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे  ही निवडणूक महत्वाची असून येत्या 17 एप्रिल रोजी  कमळ समोरील बटन दाबून समाधान आवताडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा , असे आवाहन आ. देशमुख यांनी केले. यावेळी माजी मंत्री, आ. बाळा भेगडे, आ. प्रशांत परिचाक समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143