teaching-methods-from-this-year
Education/Collage/School

Teaching : नविन 5,3,4 शिक्षण पद्धती या वर्षापासूनच; जय्यत तयारी सुरू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

Teaching नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. आता या बदलांची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा शालेय शिक्षणाचा एक एक टप्पा पूर्ण करायच्या. आता मात्र हे टप्पे बदलले जाणार आहेत. नव्या धोरणानुसार पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी याप्रमाणे टप्पे केले जाणार आहेत. आणि त्याची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून होण्याची दाट चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सरकारी पातळीवर तयारी सुरू झाली आहे.

पाला वरील वंचितांना दिले भोगीचे जेवण; शिव बसव सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम

गेल्या दोन वर्षांपासून नवीन Teaching शैक्षणिक धोरणाविषयी शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे. या धोरणातील बदलांवर वेगवेगळी मते मांडली जात आहेत. वेगवेगळ्या शिक्षणतज्ज्ञांकडूनही या धोरणातील कोणत्या बाबी चांगल्या वाटल्या तसेच कोणत्या घटकांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, याविषयीची माहिती मागवण्यात आली होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्याचा अवलंब करण्याचा, हे धोरण प्रत्यक्षात आणण्याची तयारी वेगात सुरू झाली आहे. पाच अधिक तीन अधिक चार यानुसार हे टप्पे असणार आहेत. पायाभूत, प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक वर्ग याप्रमाणे हे टप्पे मानले जातील. यातील नववी ते बारावीचा टप्पा साहजिकच शालेय जीवनातला सर्वात महत्त्वाचा विभाग असणार आहे. या नवीन टप्प्यानुसार शाळांमध्ये तसेच शिक्षण Teaching पद्धतीत नवीन बदल केले जाणार आहेत. दहावीपर्यंत शाळा व अकरावीपासून कॉलेज अशी पद्धत आपल्याकडे होती. आता ती किमान बारावीपर्यंत शालेय टप्प्यातच समाविष्ट असणार आहे. या नवीन धोरणामुळे शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करणे या पद्धतीलाही चाप बसणार असून, विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, अशा अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे. यात वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार, समस्यांचे निराकरण, सहकार्य, डिजिटल शिक्षण आदी विषयांचा समावेशदेखील असणार आहे. हे विषय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार समजावे यासाठी इयत्ता आणि विद्यार्थ्याचे वय याची योग्य सांगड घातली गेली आहे. म्हणूनच पाच अधिक तीन अधिक चार, अशी रचना त्यानुसार करण्यात आली आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com